Monday, May 5, 2025
Homeक्राईमNashik Crime : जाधव बंधू हत्या प्रकरण; हत्येतील तीन कोयते हस्तगत

Nashik Crime : जाधव बंधू हत्या प्रकरण; हत्येतील तीन कोयते हस्तगत

नाशिक | Nashik

पुणेरोडवरील आंबेडकरवाडीत उमेश व प्रशांत जाधव या सङख्या भावांचा खून (Brother Murder) करण्यासाठी वापरलेले तीन धारदार कोयते (Scythe) एसआयटीने (SIT) जप्त केले आहेत. हत्या केल्यावर सहा संशयितांनी हे कोयते गुन्ह्यातील आठवा संशयित रिक्षाचालक नीलेश उर्फ भांगगोळ्या शांताराम महाजन याच्या ताब्यात दिले होते. एसआयटीने शनिवारी त्याला अटक केल्यानंतर, रक्ताने माखलेले कोयते घरात दडविल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर एसआयटीचे प्रमुख संदीप मिटके व पथकाने त्याला सोबत घेत त्याचे घर गाठून रविवारी (दि. ४) हे कोयते हस्तगत केले.

- Advertisement -

या कोयत्यांवर अद्यापही जाधव बंधूच्या रक्ताचे डाग शाबूत असल्याचे आढळले आहे. १९ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी रात्री झालेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली होती. पोलीस (Police) तपासावर संशय च आक्षेप घेत नातलगांसह काही संस्थांनी मोर्चा काढला होता. तत्पूर्वीच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandip Karnik) यांनी या गुन्ह्याचा तपास उपनगर पोलिसांकडून काढून घेत सखोल तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करुन गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे दिला होता.

यानंतर, मिटकेसह एसआयटीने वेळकाळ न पाहता या दुहेरी हत्याकांडाच्या (Murder Case) पुनर्तपासास प्रारंभ करून पूर्वीच अटक होऊन तुरुंगात असलेल्या सागर मधुकर गरड (३२, रा. आंबेडकरवाडी), अनिल विष्णू रेडेकर (४०, रा. उत्तरानगर), सचिन विष्णू रेडेकर (४४, रा. गायत्रीनगर), योगेश चंद्रकांत रोकडे (३०, रा. आंबेडकरवाडी), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशीरे (२६, रा. नवीन सिडको) या पाच मुख्य संशयितांची पोलीस कोठडी मिळवून सखोल तपास केला.

यात दुहेरी हत्येच्या कटात सहभागी वरील संशयितांव्यतिरिक्त इतर दोन संशयित (Suspected) योगेश मधुकर गरड व मंगेश चंद्रकांत रोकडे यांना अटक केली. त्यांच्या कबुलीनंतर आठवा संशयित रिक्षाचालक नीलेश याला अटक (Arrested) झाली. त्याने चौकशीत हत्याकांडात अप्रत्यक्षरित्या सहभागी होऊन गोणपाटात भरून दिलेली हत्यारांची विल्हेवाट लावल्याचे सांगितले.

वर्चस्व वादातूनच हत्या

नीलेश उर्फ गोळ्या याने मारेकरी संशयितांकडून तिन्ही कोयते ताब्यात घेतले, यानंतर चोरीछुप्या पद्धतीने ते घरात नेले. ही कृती करतानाचे काही सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या ताब्यात मिळत आहे. हत्येंत पाच कोयत्यांचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या दुहेरी खूनप्रकरणात आतापर्यंत आठ जणांना सहभाग उघड झाला असून त्यापैकी प्रत्यक्ष सहा जणांनी मिळून जाधव बंधूंची हत्या केल्याचे निष्पन्न होत आहे हत्या करणाऱ्यांत हिस्ट्रिशीटर, नशेबाज, रिक्षाचालक व अवैध धंदे चालविणायांचा समावेश असला तरी तीन कुटुंबातील सहा सख्ख्या भावांना हत्याकांडात अटक झाली आहे. त्यात रेडेकर, रोकडे व गरड कुटुंबातील भावांचा समावेश आहे. दरम्यान, ही हत्या वर्चस्व प्रस्थापित करण्यातूनच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येते आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : पंच्याण्णव दिवसांत नाशकात वीस खून; सव्वीस विधिसंघर्षित मुलांचा...

0
नाशिक | भारत पगारे | Nashik नाशिक शहरात (Nashik City) बकासूर, रावण, मॅडी, पॅडी व अशीच काहीतरी विशेषणे जोडून सोशल मिडियावर 'रीलगिरी' करणाऱ्या अल्पवयीन मुलांनी...