Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Crime : नोकरीसाठी घेतले पन्नास लाख; तीन कुटुंबातील सहा जणांना कथित...

Nashik Crime : नोकरीसाठी घेतले पन्नास लाख; तीन कुटुंबातील सहा जणांना कथित समाजसेवकाचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘मंत्रालयात आमची ओळख असून हे पाहा मंत्र्यांसोबतचे फोटो, आम्ही तुम्हाला केंद्र शासनाची व रेल्वेत नोकरी लावून देतो’ असे सांगून देवळाली कॅम्पमधील तथाकथित समाजसेवकाने (Social Worker) तीन कुटुंबातील सहा जणांकडून तब्बल पन्नास लाख रुपये उकळले. हा समाजसेवक साथीदारांसह पसार झाला असून त्याच्या या कारनाम्याने देवळातील खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

संतोष चंद्रकांत कटारे असे कथित समाजसेवकाचे नाव असून देवळाली कॅम्प पोलिसांत (Deolali Camp Police) एकाच दिवशी त्याच्यावर तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. संतोष कटारेसह त्याचे साथीदार संशयित संतोष शिवराम गायकवाड (४५) व अमोल ठाकूर (तिघे रा. दे. कॅम्प) यांचा शोध घेतला जात असून पथके रवाना करण्यात आली आहेत. याबाबत श्रीकांत रमेश पाटील (रा. बोराडे मळा, जेलरोड), मयूर प्रवीण कांबळे (रा. म्हसोबा मंदिराजवळ, उपनगर) व संगीता मच्छिंद्र सोनवणे यांच्या भावाने फिर्यादी नोंदवल्या आहेत. त्यानुसार जुलै २०२२ ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कटारे याने देवळाली कैम्प बसस्टॅण्डशेजारी संपर्क कार्यालय थाटून कथित समाजसेवा केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

त्याने तक्रारदार पाटील यांच्यासह कांबळे व सोनवणे यांना वरील कालावधीत बऱ्याच मुलांना (Boys) नोकरी लावल्याचे बनावट कागदपत्र दाखवले. तिघांसह नातलगांचा विश्वास संपादन करत ‘भारतीय रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून दोघांकडून प्रत्येकी सात लाख रुपये घेतले. अशाचप्रकारे अन्य चौघांकडूनही पैसे उकळले.पैसे घेतल्यानंतर कालांतराने तक्रारदारांची बनावट मेडिकल चाचणी करून मुंबईतील (Mumbai) ‘सीएसटी रेल्वे स्टेशनमधील ऑफिसमध्ये नेऊन भारतीय रेल्वेच्या ‘लेटरहेडवर ‘जॉईनिंग लेटर देऊन ते खरे असल्याचे भासवले.

त्यानंतर कांजूर मार्ग रेल्वे स्टेशन येथे अनाऊन्सिंग डिपार्टमेंटमध्ये विनोद मंडल यांचे नाव सांगून हजर होण्याचे सांगून रेल्वेचे खोटे प्रशिक्षण करवून घेतले. अशाच पद्धतीने इतर चौघांचीही फसवणूक झाली असून आता कटारेच्या या ‘जॉबलेस’ प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी (Police) व्यक्त केली आहे. अशाच पद्धतीने फसवणूक (Fraud) झाली असेल तर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...