Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : जमिनीच्या वादातून दाेघांची हत्या; सहा जणांना बेड्या

Nashik Crime : जमिनीच्या वादातून दाेघांची हत्या; सहा जणांना बेड्या

धन सापडल्याचे सांगून मित्रांना पठारावर बाेलविले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जायखेडा (Jaikheda) येथील साल्हेर किल्ल्याच्या (Salher Fort) पठारावर शुक्रवारी (दि.२२) दोन पुरुषांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळले होते. या दोघांचा खून नातलगांसह त्यांच्या मित्रांनी जमिनीच्या वादातून (land Dispute) केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी सटाणा, देवळा व कळवण तालुक्यातील सहा जणांना अटक केली आहे. 

- Advertisement -

साल्हेर किल्ल्याच्या पठारावर शुक्रवारी दोन पुरुषांचे कुजलेले मृतदेह आढळून आले होते. दोघांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर शस्त्रांचे वार केल्याचे आढळून आले. मृतदेहांच्या वस्त्र व इतर चीजवस्तूंवरून पोलिसांनी मृतांची ओळख पटवली. त्यात रामभाऊ गोटीराम वाघ (६०, रा. गोपाळखडी, ता. कळवण) व नरेश रंगनाथ पवार (६३, रा. ता. कळवण) अशी खुन झालेल्या दोघांची नावे समाेर आली. त्यानुसार जायखेडा पोलिस ठाण्यात (Jaikheda Police Station) मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासास सुरुवात केली.

पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या पथकांनी तपास करुन रामभाऊ वाघ व नरेश पवार हे दोघेही १३ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद अभोणा पोलिस ठाण्यात होती हे पडताळले. दोघेही दुचाकीवरून सटाण्याच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी करून साल्हेर किल्ला व केळझर धरण परिसरात सापळे रचून सहा संशयितांची धरपकड केली.

दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक दत्ता कांभीरे, सहायक उपनिरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, हवालदार गिरीष निकुंभ, शरद मोगल, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, तांत्रिक विश्लेषण शाखेचे हवालदार हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने या दुहेरी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली. 

हे आहेत संशयित

विश्वास दामू देशमुख (३६, रा. केळझर, ता. सटाणा), तानाजी आनंदा पवार (३६, रा. खालप, ता. देवळा), शरद उर्फ बारकु दुगाजी गांगुर्डे (३०, रा. बागडु, ता. कळवण), सोमनाथ मोतीराम वाघ (५०), गोपीनाथ साेमनाथ वाघ (२८, दोघे रा. गोपाळखडी, ता. कळवण) व अशोक महादू भोये (३५, रा. सावरपाडा, ता. कळवण)

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...