नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे ओळख पटवून सध्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने रस्त्यांची कामे सुरु आहेत. यावेळी अंबड औद्योगिक वसाहतीत रस्ते मार्गात बदल करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच पोलीस प्रशासनावरील तणाव देखील वाढला आहे.
रस्त्यात वाहने लावणाऱ्यांवर पोलिसांतर्फे (Police) कारवाईचा बडगा उचलला जाऊन गुन्हे देखील दाखल केले जात आहे. याचाच राग मनात धरून दोघा अनोळखी व्यक्तींनी अंबड औद्योगिक वसाहतीतील पोलीस चौकीवर दगडफेक करून त्याठिकाणाहून पळ काढला. या गुन्ह्याचा तपास करत असतांना गुन्हे शाखा युनिट २ चे श्रेणी उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी, हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, जितेंद्र वजीरे यांनी गुन्हयाच्या घटनास्थळास तात्काळ भेट देवुन तेथील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली होती. सदर सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये दोन व्यक्ती हे पोलीस चौकीवर दगडफेक करून पळतांना दिसुन आले. हाच तपासाचा धागा पकडून नमुद पथकाने सदर ठिकाणावरून जवळजवळ ८ ते १० किलोमीटर परिसरातील सी.सी.टी. व्ही कॅमेरे बघितले.
त्यावरून अंमलदार महेश खांडबहाले व तेजस मते यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील संशयित हे शमसुददीन शहा व संतोष सरोज हे पाथर्टीफाटा अंबडगांव या परिसरात मोपेड गाडीवर फिरत आहेत. त्यांनी हि माहिती प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देत गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने पाथर्डीफाटा ते अंबडगांव दरम्यान सिडको हॉस्पिटलच्या पुढे रस्त्याचे कडेला सापळा लावुन संशयीत शमसुददीन नसरूल्लाह शहा (५२ वर्ष, रा. फ्लॅट नंबर ०४, गजानन अपार्टमेंट, चुंचाळेगांव, अंबडलिंकरोड, नाशिक), संतोष मनिराम सरोज (३४ वर्ष, रा. फ्लॅट नंबर ०१, यशोदा अपार्टमेंट, जाणता राजा चौक, संजीवनगर, अंबडलिंकरोड, नाशिक) यांना ताब्यात घेत पुढील तपास कामी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.





