नाशिक | Nashik
शहरातील फुलेनगर परिसरात (Fulenagar Area) पुन्हा सराईतांच्या टोळीने मागील भांडणाची कुरापत काढून दगडफेक व हवेत गोळीबार (Firing) केल्याची घटना बुधवारी (दि.२३) पहाटे अडीच वाजेदरम्यान घडली आहे. यात कोणीही जखमी झाले नसले तरी या राड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबार प्रकरणात सर्व सराईत (Criminal) गुन्हेगार असून,प्रत्येकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. तर गुन्ह्यातील दोघे हद्दपार असून, त्यांनी शहरात (City) वावरत असताना गुन्हा केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्वांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी दहा ते बारा जणांवर पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये (Citizen) प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पंचवटी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, ते फरार असणाऱ्यांच्या मागावर आहेत.




