Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : बागुलांचा पुतण्या अजयचा अखेर 'पराजय'; गोळीबार प्रकरणी मुख्य संशयित...

Nashik Crime : बागुलांचा पुतण्या अजयचा अखेर ‘पराजय’; गोळीबार प्रकरणी मुख्य संशयित बोरिसाला अटक

गोळीबार प्रकरणात अजय बागुलला सहा दिवसांची कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीतील रामवाडी ते विसे मळा मार्गावर ओळखीतील व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणात गुन्हेशाखा युनिट एकने भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचा पुतण्या व मुख्य सूत्रधार अजय दिलीप बागूल याला नाशिकमधून ताब्यात घेऊन अटक केली. त्याला व इतर दोघांना न्यायालयाने (Court) येत्या शुक्रवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत अजयसह मामा राजवाडे व अमोल पाटील अशा एकूण ११ जणांना अटक झाली आहे. तर बागूल टोळीचा प्रमुख म्हणून अजयचे नाव नोंदवण्यात आले आहे.

- Advertisement -

वाहन खरेदी-विक्री करणारा सचिन साळुंखे (रा. इंदिरानगर) या तरुणावर २५ सप्टेंबरला पहाटे गोळीबार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) बागूल टोळीवर प्राणघातक हल्ल्यासह भारतीय हत्यार काययद्यान्वये गुन्हा नोंद आहे. तर, याबाबत भाजप नेते सुनील बागूल यांना सात दिवसांपूर्वीच आयुक्तालयाने तंबी दिली होती. मात्र, प्रकरणातील मुख्य संशयित अजय दिलीप बागूल व बाब्या उर्फ सचिन सुखलाल कुमावत, पप्या उर्फ दिलीप जाधव (तिघे रा. बायजा बाईची छावणी, आदर्शनगर, पंचवटी) हे सतरा दिवसांपासून पसार होते. ते शनिवारी रात्री वेगवेगळ्या भागात लपून बसलेले असताना युनिट एकने (Unit One) गोपनीय माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेऊन अटक केली.

YouTube video player

रविवारी (दि. १२) सकाळी न्यायालयात जाण्यापूर्वी अजय बागूल, सचिन कुमावत व दिलीप जाधव यांनीही ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अशी घोषणा दिल्या. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणाबद्दलच्या व्हिडीओचा ‘तिसरा भाग’ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला. दरम्यान, या प्रकरणात सराईत गुंड व फायरिंग करणारा अजय जेठालाल बोरिसाला आज (सोमवारी) पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. तर तुकाराम चोथवे हा अद्यापही फरार आहे.

ही आहे बागुल गँग

अजय दिलीप बागूल, सागर सुधाकर बागूल, गौरव सुधाकर बागूल, प्रेमकुमार दत्तात्रय काळे, वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे, मामा उर्फ बाबासाहेब वाल्मिक राजवाडे, अमोल भास्कर पाटील, संदीप रघुनाथ शेळके, बाब्या उर्फ सचिन सुखलाल कुमावत, पप्या उर्फ दिलीप जाधव (सर्व रा. बायजाबाईची छावणी, आदर्शनगर, पंचवटी) यांचा समावेश आहे. अटक केलेल्या अजयसह इतरांना रविवारी सकाळी युनिट एकच्या कार्यालयात ‘कडक’ चहाची मेजवानी देण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, तुकाराम चोथवे, अजय बोरिसा आणि कुंदन परदेशी व तत्सम संशयित पंचवटीतील विविध गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके असल्याचेही समोर आले आहे. अजयसह बागूल घराण्यातील कुलदीपकांच्या बचावासाठी भाजपत काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले सुनील बागूल मुंबईत ठाण मांडून होते. मात्र, त्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते.

ठळक मुद्दे

  • मामा राजवाडे सुनील बागुल यांचा खंदा समर्थक व रिक्षा युनियनचा नेता
  • बागूल टाेळीत दाेन कुटुंबातील सख्ख्ये भाऊ संशयित
  • पिस्तूल जप्त करणे बाकी
  • अमाेल पाटील अजयचा ‘खास’ मित्र
  • युनिट एकमध्ये ‘सध्या’ आणल्या जाणाऱ्या सर्वांनाच कडक मेजवानी

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...