नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अनैतिक संबंधासह अन्य पूर्ववैमनस्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ले (Attack) केल्याची घटना मुंबईनाका पोलिसांच्या हद्दीतील इनायत कॅफेसमोर घडली होती. त्यात जबर जखमी झालेल्या एका गटातील संशयित दीपक संजय कपिले (रा. गोरेराम लेन, रविवार कारंजा) याने पंचवटीतील (Panchvati) खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार घेतांना पोलिसांच्या उपस्थितीत पळ काढला आहे. त्याच्या शोधार्थ पथके रवाना झाली असून, पोलिसांनी आता कपिलेच्या काही नातलगांकडे चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. तर काहींना ताब्यात घेतल्याचे समजते.
एकमेकांवर प्राणघातक हल्ला करून झालेल्या राडाप्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडिओतील (Viral Video) चार संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकने तेव्हा अटक केली होती. चौधांमध्ये दोन महिलांचा समावेश असून, मुंबई नाका पोलिसांत (Mumbai Naka Police) परस्परविरोधी प्राणघातक हल्ल्याची गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रोहित रंगनाथ गोरडे, मयूरी गोरडे (दोघे रा. दीक्षित चाळ, खैरगल्ली), ऐश्वर्या विकास भुजंग (रा. मुंबई नाका) यांच्याक्किद्ध दीपक संजय कपिले (रा. गोरेराम गल्ली, रविवार कारंजा) याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद आहे. तर मयूरी गोरडेच्या फिर्यादीवरुन संशयित दीपक कपिले व दत्ता आंधळेविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
दोन्ही गटांच्या हल्ल्यात एका गटातील कपिलेच्या गळ्यावर वार झाल्याने त्याला २२ टाके पडले होते. त्यामुळे त्याच्यावर पंचवटीतील हिरावाडी (Hirawadi) रोडनजिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गुन्हा दाखल असल्याने तो संशयित म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) निरीक्षणाखाली होता. उपचार पूर्ण होताच त्याला अटकेची तजवीज करण्यात आली होती असे असतानाच, शनिवारी रात्री कपिले याने ड्यूटीवरील पोलिसांची नजर चुकवून रुग्णालयातील रुममधून पळ काढला. काही वेळाने हा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली.
पोलिसांनी (Police) सीसीटीव्ही पडताळून त्याचा शोध घेतला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. कपिलेवर हल्ला करणारे आणि त्याचा साथीदार हे न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून कपिले याने वकिलांकरवी न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. त्यावर माळवारी (दि. १०) सुनावणी होणार होती. मात्र, तत्पूर्वीच कपिलेने रुग्णालयातून पोलिसांच्या निगराणीतून पळ काढला. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना देखील ताब्यात घेतले आहे. दिक्सपाळीत दोन आणि रात्रपाळीत दोन पोलीस अंमलदार पहारा देत असताना देखील संशयित फरार झाल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.