Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमNashik Crime : फरार संशयिताला अटक

Nashik Crime : फरार संशयिताला अटक

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

बलात्काराच्या गुन्ह्यातील (Rape Case) फरार संशयिताला नाशिकरोड रेल्वे स्थानकातील (Nashik Road Railway Station) रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी रेल्वे गाडीतून पकडून अर्नाला पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले.आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक हरफूलसिंह यादव यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

वसई विरारमधील मीरा भाईंदर येथील अर्नाला पोलीस ठाण्यात (Arnala Police Station) ४ जानेवारीला बलात्कार प्रकरणी अभिषेक सूर्यनारायण मंडल (२१, रा. फूलपाडा डॅम, जीवदानी मंदिराजवळ, विरार पूर्व) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. अभिषेकने कळंब समुद्र किनारी एक महिलेला फिरण्यासाठी आपल्या मित्रासोबत बोलावले होते. तेथील हॉटेलात नेऊन महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर अभिषेक फरार झाला होता.पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन शोधले असता कल्याणहून नाशिकला जात असलेल्या पवन एक्स्प्रेसमध्ये अभिषेक असल्याचे पोलिसांना (Police) समजले.

त्यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकातील हरफूल सिंह यादव यांना याची माहिती देऊन मदतीची विनंती केली. अभिषेकचा फोटो त्यांना पाठविला. पवन एक्स्प्रेस नाशिकरोडला आली असता यादव यांनी आरपीएफ जवानांच्या मदतीने शोध घेतला असता रेल्वे इंजिनाच्या शेजारील डब्यात अभिषेक आढळला. त्याला आरपीएफ कार्यालयात आणून कसून चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देताच यादव यांनी अर्नाला पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्या ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवराम डामरे, पोलीस राजेंद्र पवार, विजय आलगे यांनी नाशिकरोडला (Nashik Road) येऊन कायदेशीर पूर्तता केली. त्यानंतर संशयित अभिषेकला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या