Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Crime : खुनात 'ती'चाही सहभाग; राखपसरे हत्येत संशयिताची विधिसंघर्षित प्रेयसी सहसंशयित

Nashik Crime : खुनात ‘ती’चाही सहभाग; राखपसरे हत्येत संशयिताची विधिसंघर्षित प्रेयसी सहसंशयित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वडाळानाका परिसरातील (Wadala Naka Area) नागसेनवाडीत अनैतिक प्रेमसंबंधातून घडलेल्या रिक्षाचालक सुमीत सुखारन राखपसरे (वय २८) याच्या निर्घुण हत्येप्रकरणात (Murder Case) तपासाला नवे वळण मिळाले आहे. मुख्य संशयित ओमकार अर्जुन गायकवाड याच्या अल्पवयीन प्रेयसीलाही या गुन्ह्यात संहसंशयित करण्यात आले असून ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

खुनानंतर ओमकारने थेट तिच्या घरी जाऊन रक्तरंजित कपडे बदलले, तसेच हत्येसाठी वापरलेला चाकू तिच्या घरातच लपवून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संशयित मारेकऱ्यास ‘आसरा’ देत पुरावे लपवण्यास मदत केल्याचा उपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. सुमीतची हत्या केल्यानंतर ओमकार घाबरलेल्या अवस्थेत प्रेक्सीच्या घरी पोहोचला. त्याच्या अंगावरील सुमीतच्या रक्ताने माखलेले कपडे त्याने तेथेच काढून ठेवत दूसरे परिधान केले.

YouTube video player

एवढ्यावरच न थांबता, हत्येसाठी वापरलेला चाकूही तिच्या घरात लपविला. संशयित प्रेयसी अकरावी इयत्तेत शिक्षण घेत असून, ती अल्पवयीन असल्याने तिच्याविरोधातील पुढील सर्व कार्यवाही बाल न्यायमंडळामार्फत केली जात आहे. दरम्यान, चाकूच रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. आता तपासात मृत सुमीतच्या प्रेक्सीच्या संशयित पतीचा या गुन्ह्यात काही सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

अनैतिक संबंध, त्यातून निर्माण झालेला संशय आणि उद्रेक तपासला जात आहे. तपासात अल्पवयीन मुलीचा सहभाग आढळल्याने मुलीचे आयुष्यही गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे.सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बाध हे तपास करत असून, आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

‘भाई’ होण्याच्या नादात आयुष्य उद्ध्वस्त

अटक करण्यात आलेल्या ओमकार गायकवाडने स्वतःला ‘नागसेनवाडीचा ‘भाई’ म्हणून मिखण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, एका खुनाने त्याचे हे स्वप्न भंगले आहे. या गुन्ह्यानंतर त्याला जामीन मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ओमकारचे वडील परागंदा असून तो आईसोबत राहतो. तर, दूसरा संशयित मोईन शेख याचे वडील रिक्षाचालक असून आई संवेदनशील आजाराने ग्रस्त आहे, असे समजते.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...