Saturday, July 25, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'त्या' खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर दगडफेक

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर दगडफेक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले. तरुणीची छेडछाड केल्याच्या आरोपातूनच हा खून (Murder) झाल्याचे तपासात निष्पन्न होत असून हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. तरुणाकडील संतप्त जमावासह मित्रांनी संशयित मारेकऱ्यांच्या घरावर दगडफेक करुन वाहनासह टपरीची तोडफोड केल्याची घटना घडली.

- Advertisement -

रवी उशिले याच्या हत्येचा तपास वैयक्तिक वाद किंवा किरकोळ भांडणाच्या दिशेने सुरू होता. मात्र, चौकशीत संबंधित तरुणावर (Youth) एका तरुणीची छेडछाड केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून आता गुन्हाही नोंद झाला आहे. या आरोपानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. याच वादातून संबंधित तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. हत्येची माहिती कळताच वीस ते पंचवीस जणांच्या जमावाने गजवक्र नगरात गर्दी करत दगडफेक केली. दगडफेकीत घराच्या काचा फुटल्या, दुचाकी व इतर मालमत्तेचे नुकसान झाले.

दरम्यान, या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात काही संशयितांची नावे पुढे आली असून त्यांचा शोध सुरु आहे, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत असून, जमावात सहभागी असलेल्या इतर संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पेठरोड परिसरात बंदोबस्त तैनात असून तपास सुरु आहे. खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेले संशयित संतोष पांडूरंग गवळी व ओम् संदीप गवळी यांच्याकडे तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...