Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : सिन्नरच्या दातलीत सराईत गुन्हेगाराची हत्या

Nashik Crime : सिन्नरच्या दातलीत सराईत गुन्हेगाराची हत्या

सिन्नर | Sinnar

भाऊबंदकीच्या वादात (Fraternal Dispute) झालेल्या मारहाणीनंतर सराईत गुन्हेगाराचा (Criminal) खून (Murder) झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील दातली (Datli) येथे घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की,’सागर मारुती भाबड (वय ४०) रा. नाशिकरोड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याचे वडील मारुती भाबड यांनी मेंढी येथील व्यसनमुक्ती केंद्रात आत्महत्या केली होती. त्यांच्या अंत्यविधीसाठी तो दातलीत आला होता. मात्र काल (शुक्रवारी) सायंकाळी त्याचे चुलत भावांबरोबर जुन्या कुरापती वरून भांडण सुरू झाले. जवळपास अर्धा तास हे भांडण सुरू होते. यानंतर हे भांडण इतके विकोपाला गेले की त्याच्याबरोबर चुलत भावांची तुंबळ हाणामारी सुरू झाली. या भांडणात (Fight) चुलत भावांनी त्याच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घातल्याचे समजते. या घटनेत १२ ते १३ जणांचा सहभाग असल्याचे कळते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर रात्री उशिरा पोलिसांकडून १२ ते १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. तर सागरचा मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात (Sinnar Rural Hospital) आणलेला असतानाही पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सिन्नर पोलिसात (Sinnar Police) अनेक गुन्हे दाखल आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...