शिरवाडे वाकद | वार्ताहर | Shirwade Wakad
कामावर जेसीबी (JCB) घेऊन जातो असे सांगत मित्रांच्या मदतीने (Help) बनावट कागदपत्रे बनवून चक्क १५ लाख रुपये किमतीचे जेसीबी परस्पर विकल्याची घटना घडली असून ८ आरोपींच्या विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Baswant Police Station) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सचिन सुधाकर जाधव (वय ३४ धंदा – शेती, रा.कुंभारी, ता.निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी वैभव सोमनाथ तांबे रा.नांदुरखुर्द, ता.निफाड हा फिर्यादीचे जेसीबी मशीनवर मशीन ऑपरेटर म्हणून कामावर आहे. दि.२४ सप्टेंबर २०२४ रोजी ९.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीचे मालकीचे एम.एच २० सी.एच ६०९६ हे सुमारे १५ लाख रुपये किंमतीचे जेसीबी आरोपी वैभव सोमनाथ तांबे याने कामावर (Work) न्यायचे आहे असे सांगुन फिर्यादी याच्याकडून घेऊन गेला.
त्यानंतर उर्वरीत आरोपी सचिन जाधव रा.खेलदरी, ता.चांदवड, गोविंद चव्हाण व बंडु पगार रा.दरसवाडी ता.चांदवड, सचिन पिंगळे, रा.नांदुरखुर्द, ता.निफाड, रोशन आहेर रा.देवळा, सौरभ अर्जुन पवार रा.पाथर्डी फाटा, नाशिक असे सर्वांनी मिळुन नाशिक येथील दलाल विवेक बारसु रहाणे (उर्फ मुन्ना) याचे मार्फतीने संतोष मच्छिन्द्र आकोलकर रा.करंजी, कोल्हेवाडी, ता.पाथर्डी, जि.आहिल्यानगर यांस काहीतरी बनावट कागदपत्रे बनवुन ५ लाख ५० हजार रुपये किंमतीस परस्पर विक्री करुन संगनमताने फिर्यादीचा (Prosecutor) विश्वासघात केला.
दरम्यान, त्यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (ब) पोलीस ठाण्यात सी.सी.टी.एन.एस ठकबाजी ३२३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१६(४ ), ३(५) प्रमाणे गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कोल्हे अधिक तपास करीत आहेत.