Saturday, January 10, 2026
Homeक्राईमNashik Crime : भरारी पथकाची धाड; नऊ कोटींचा प्रतिबंधित ऐवज जप्त

Nashik Crime : भरारी पथकाची धाड; नऊ कोटींचा प्रतिबंधित ऐवज जप्त

संचालकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा

ओझे | वार्ताहर | Oze

राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला, सिगरेट व तत्सम साहित्य असा एकूण ९ कोटी ६ लाख २५ हजार ४२५ रुपयांचा ऐवज नाशिकच्या अन्न व सुरक्षा विभागाच्या भरारी पथकाने (Flying Squad) जप्त केला आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात (Dindori Police) तक्रार देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात कोट्यवधींचा गोरख धंद्यात वापरला जाणारा प्रतिबंधित ऐवज आढळल्याने दिंडोरी पोलिसांच्या अकार्यक्षमतेबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

- Advertisement -

याबाबत फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, गट क्रमांक 352/2 यामध्ये मे.ईलाईटक्रोन इंटरनॕशनल लिमिटेड ही आस्थापित कंपनी आहे. या कंपनीत संशयास्पदरीत्या प्रतिबंधित ऐवजाचा साठा स्वतःच्या फायद्यासाठी दडवून ठेवल्याची गोपनीय माहिती अन्न व सुरक्षा विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर सदर ठिकाणी अन्न व औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी, विशेष भरारी पथकातील गजानन मोरे ,अन्न सुरक्षा अधिकारी अमरावती सहाय्यक आयुक्त सानप यांचे आदेशान्वये अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये प्रतिबंधीत अन्न पदार्थ जप्तीसाठी सहाय्याक आयुक्त वि पा धवड , अन्न सुरक्षा अधिकारी गो वि कासार , गो मो गायकवाड ,यांनी ग्लोबल टोबॕको एजन्सी गट नंबर 527/A/3 सम्राट फि पि यु ईंडस्ट्रीज ईगतपुरी, नाशिकरोड, गोंदे दुमाला नाशिक (Nashik) येथे छापा (Raid) टाकला.

YouTube video player

त्यानंतर तपासणी केली सदर ठिकाणी विविध प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला होता. त्यापैकी सबा प्रिमीयम प्रिमीक्स आॕफ शीशा या प्रतिबंधि त अन्न पदार्थाच्या लेबलवर मे.ईलाईटक्राॕन इंटरनॕशनल लिमीटेड गट नंबर 352/2 मौजे तळेगाव दिंडोरी असे आढळुन आले. यानंतर वरीष्ठ अधिकाऱ्यांसह पथकातील अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याठिकाणी विविध प्रकारच्या सिगरेट्सचे उत्पादन होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी ब्रँडसची तपासणी केली असता तंबाखुला कोणताही सुगंध नसल्याचे आढळून आले. तसेच सदर ठिकाणी टोबॕको रिफाईंड ग्लीसरीन ,ईंडस्ट्रीयल परफ्युम, मसाला कंपाऊंड रिफाईंड सोयाबीन अशा विविध घटकांपासून विविध प्रकारचे सुगंधीत तंबाखू उत्पादन होत असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, यामध्ये प्रीमिक्स शीशा पॅकेट नामक ५०८ बॉक्स,किंमत ३ कोटी ८१ लाख रुपये, कंटेनींग सेंटेड टोबॕको ५१० बॉक्स ३ कोटी ८२ लाख ५० हजार, अल सबा प्रीमीयम शीशा पॅकेट कंटेनींग सेंटेड टोबॕको किंमत ९ लाख ७५ हजार स्पार्क जर्दा पॅकेट कंटेनिंग सेंटेड टोबॕको किंमत १ लाख ९८ हजार ३७५ , गोपाल ईंडस्ट्रीयल परफ्युमरी ९१५० किलो क्षमतेचे प्लास्टीक डब्बे अंदाजे किंमत १२ लाख ५० हजार , सेंटेड मसाला कंपाउंड ,साडेबारा किलोचे ६२ डब्बे १ कोटी १४ लाख ८५ हजार ५००, रिफाईंड सोयाबीन ऑइल १५ किलो क्षमतेचे ६१ टिन किंमत १ लाख ४९ हजार ४५०, रिफाईंड ग्लीसरीन १९० लिटर किंमत १७ हजार १००, पॅकिंग मटेरीयल विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू वजन ३५०० किलो किंमत दोन लाख रूपये असा एकूण ९ कोटी ६ लाख २५ हजार ४२५ रूपयांचा ऐवज धाडसत्रात जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

अपघात

ओडिशात ‘इंडिया वन एअर’च्या विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ६ जण जखमी

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiओडिशामध्ये शनिवारी दुपारी भुवनेश्वरहून राउरकेला येथे जाणाऱ्या 'इंडिया वन एअर'च्या ९ सीटर विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे....