Tuesday, March 25, 2025
HomeUncategorizedNashik Crime : सराफ कारागिर पश्चिम बंगालमधून ताब्यात; पंचवटीतील महिलांचे दागिने घेऊन...

Nashik Crime : सराफ कारागिर पश्चिम बंगालमधून ताब्यात; पंचवटीतील महिलांचे दागिने घेऊन काढला हाेता पळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सोन्याचे नवीन दागिने बनवून देतो सांगत जवळपास साडे चार लाख रुपयांचे दागिने ताब्यात घेत त्याचा अपहार करून पळ काढलेल्या संशयितास (Suspected) पश्चिम बंगालमधून ताब्यात घेण्यात आले आहे. युनिट एकाच्या (Unit One) पथकाने हा कारवाई केली असून अमित सुकदेव भुनिया (वय ३८, हल्ली रा. खांदवे निवास, मखमलाबाद नाका, पंचवटी, मूळ रा. रबिदासपूर पो. स्ट. दासपूर, जिल्हा पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) असे या संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

संशयित अमित भुनिया यांचे मखमलाबाद नाका येथे ओम साईराम अलंकार नावाने सराफी दुकान होते. दरम्यान, संगीता सतीश माळवे यांच्यासह इतर सहा महिला व पुरुषांनी अमितकडे नवीन सोन्याचे दागिने बनविण्यासाठी जवळपास चार लाख बारा हजार रुपयांचे जुने सोने दिले होते. मात्र, दुरुस्ती व नवीन सोने बनवून न देता अमितने या सोन्याचा अपहार करत पळ काढला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरु असतानाच, उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना अमित हा पश्चिम बंगाल येथे असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, ही माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना कळवून एक पथक पश्चिम बंगालकडे रवाना करण्यात आले. अमित हा माओवादी परिसरात वास्तव्यास असल्याचे समजले. पश्चिम बंगाल येथील स्थानिक पोलिसांची मदत घेत सापळा रचून  संशयित यास ताब्यात घेतले. बुधवार (दि. १९) ताब्यात घेतले. संशयिताचा ताबा पंचवटी पोलीसांकडे देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, उपनिरीक्षक रविंद्र बागुल, हवालदार प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदीप भांड, नाझीम पठाण यांनी कारवाई केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...