Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Crime News : आमदाराकडे खंडणी मागणारे गजाआड

Nashik Crime News : आमदाराकडे खंडणी मागणारे गजाआड

पक्षश्रेष्ठींकडून तिकीट देण्याचे आमिष; परप्रांतीय सराईत दिल्लीतून ताब्यात

नाशिक | Nashik

पंतप्रधान कार्यालयातून (PMO Office) सचिव बोलत असल्याचे भासवून नाशिकमधील (Nashik) महिला आमदारास (Female MLA) भाजपकडून अधिकृत एबी फॉर्म कन्फर्म करुन देण्याचे सांगून ५० लाख रुपये न दिल्यास बदनामीची धमकी देणाऱ्या परप्रांतीय सराईतांचा ताबा नाशिक पोलिसांनी दिल्ली पोलिसांकडून घेत त्यांना नाशकात आणले आहे. गुन्हेशाखा युनिट एकने (Unit One) ही कारवाई केली असून गेल्या आठवड्यात फसवणुकीचा हा प्रकार नाशिकमध्ये घडला होता. संशयितांनी दोघांनी जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना फोन करून पैशांची मागणी केली होती.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : जिल्ह्यातून ५७ अर्ज दाखल; खोसकरांच्या उमेदवारीसाठी भुजबळांची हजेरी

सर्वेश सुरेंद्र मिश्रा उर्फ शिवा उर्फ दिनू (रा. गाजियाबाद, उत्तरप्रदेश) व गौरव नाथ बहादुर सिंग नाथ (रा. दिल्ली) अशी संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके व गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका विद्यमान आमदारास ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस दिल्ली (Delhi) येथून फोन आला होता. त्याने HIMba सांगत तो पीएमओतून प्रधान सचिव बोलत असल्याचे सांगितले. तुमचे विधानसभेचे तिकीट रद्द केल्याचे सांगत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र वाचून दाखवले.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

तसेच तुम्हाला विधानसभेचे (Vidhansabha) तिकीट हवे असल्यास ५० लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. पैसे न दिल्यास पक्षाकडून तिकीट भेटले तरी राज्यात बदनामी केली जाईल अशी धमकी दिली. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली. पथकाने दिल्लीत जाऊन तपास केला असता संशयितांविरोधात दिल्ली येथेही खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे समजले. तसेच ते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजले.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Elections : भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; PM मोदींसह ‘या’ ४० नेत्यांच्या समावेश

दरम्यान, दिल्ली पोलिसांची कस्टडी संपल्यावर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) दोघांचा ताबा मिळविला. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२८) पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे यांनी ही कामगिरी केली.

हे देखील वाचा : Nashik Political : काँग्रेस कमिटीला कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे; शहरात एकही जागा न सुटल्याने संताप

दोघांवर बंगलोरलाही गंभीर गुन्हे

दोघांविरोधात बंगलोर, दिल्ली येथेही गुन्हा दाखल आहे. संशयितांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून उमेदवारांची इत्यंभूत माहिती घेत फोन केल्याचे उघड झाले आहे. तसेच त्यांनी जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना फोन करून पैशांची मागणी केली. दोघेही संभाषण करण्यात पटाईत असून समोरच्यावर अधिकारी असल्याची छाप पाडण्यात ते बहुतांश वेळा यशस्वी होत असल्याचे समजते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या