Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : मटका अड्ड्यावर छापा; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : मटका अड्ड्यावर छापा; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

कळवण | प्रतिनिधी | Kalwan

कळवण शहरामध्ये (Kalwan City) मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३९ हजार २४० रुपये रोख, ५६ हजार रुपये किमतीचे मोबाईल व सात लाख रुपयांच्या मोटारसायकलींसह मटका जुगार अड्डाचे साहित्य आदी ७ लाख ९५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Sezied) करण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

कळवण पोलीस ठाणे (Kalwan Police Station) हद्दीत ओतूर रोड परिसरात महालक्ष्मी थिएटरलगत असलेल्या ठिकाणी काही व्यक्ती अवैधरीत्या मटका जुगाराचा अड्डा चालवत असल्याची गोपनीय बातमी परिविक्षाधीन अपराजिता अग्निहोत्री यांना मिळाली होती. त्यानुसार काल आठवडे बाजाराच्या दिवशी विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. सदर कारवाईत अवैधरीत्या मटका जुगार खेळणारे व खेळवणाऱ्यांमध्ये भाऊसाहेब पगार, दिलीप कारभारी पगार, हनुमान सुपडू डावरे, रामलाल त्र्यंबक शिलावंत, निर्मल उदय जेवराणी, मंगेश तानाजी पवार, देवबा दगा पवार, रामा संभाजी पवार आदींना पोलिसांनी ताब्यात (Detained) घेतले.

सदर कारवाईत मटका चालवणारा आरोपी भाऊसाहेब पगार याच्या सांगण्यावरून आर्थिक फायद्यासाठी मिलन व कल्याण नावाचा मटका जुगार खेळताना व खेळवताना मिळून आले. त्यांच्या कब्जातून रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकली व मटका जुगार साहित्य असा ७ लाख ९५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील ताब्यात घेतलेल्या आरोपीविरुद्ध कळवण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कळवण महालक्ष्मी थिएटरलगत असलेल्या ओतूर रोड परिसरात शैलेंद्र किसन कानडे हा व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररीत्या देशी मद्याची विक्री करताना मिळून आला असून त्याच्या ताब्यातून देशी मद्याचा साठा व मोबाईल असा एकूण १३५९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर आरोपीविरुद्ध गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे परिविक्षाधिन अपराजिता अग्निहोत्री, परि. पोलीस उपअधीक्षक अद्विता शिंदे, नीलेश बोडके, सुनील पगारे, राहुल गांगुर्डे, योगेश हेंबाडे, प्रकाश रिकामे, चेतन शेवाळे, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

कोम्बिंग मोहीम राबवा

सप्तशृंगगड व पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात बसस्थानकासमोर एका घरात राजरोस मटका जुगार व परिसरात अवैध गावठी, देशी, विदेशी दारुविक्री स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे हे धंदे राजरोस सुरू आहेत. यामुळे येथे आपापसात भांडणे होतात. या भांडणांचा इतर नागरिकांना व देवी भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. कालच्या कारवाईप्रमाणे जिल्हा अधीक्षकांनी या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करून करावे, अशी मागणी येथील आदिवासी महिलांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...