Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : 'टेकओव्हर लोन' काढत गंडा; फायनान्स कंपनीच्या १६ लाखांचा अपहार

Nashik Crime : ‘टेकओव्हर लोन’ काढत गंडा; फायनान्स कंपनीच्या १६ लाखांचा अपहार

नाशिक | Nashik

बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर ‘टेकओव्हर लोन’ मंजूर करून संशयिताने फायनान्स कंपनीकडून (Finance Company) १६ लाख १५ हजार रुपये घेत त्याचा अपहार (Embezzlement) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुपीक फिनटेक प्रा. लि. कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) संशयित निखील अरुण खैरनार (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड) याच्याविरोधात फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

कॉलेजरोडवरील रुपीक फायनान्स कंपनीतील अक्षय संजय घागरमळे (३१, रा. श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील खैरनार याने ९ ते १ नोव्हेंबर दरम्यान, गंडा घातला. निखील खैरनार याने फायनान्स कंपनीत येत सी. एस. बी. बँकेकडे ३४०.५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यावर १५ लाख ९८ हजार ६५८ रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगत कर्जपावती दिली होती.

या कर्ज पावतीच्या आधारे संशयित (Suspect) निखीलने फायनान्स कंपनीकडे टेकओव्हर लोन मागितले. त्यानुसार फायनान्स कंपनीने पावतीवरील वर्णनाच्या आधारे सोन्याच्या दागिन्यांची किमंत काढून त्यावरून ७५ टक्क्यांनी १६ लाख १५ हजार रुपये कर्ज मंजूर केले. तसेच फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी निखील याच्या घरी जाऊन खातरजमा केली. त्यानंतर रुपीक फायनान्स कंपनीकडून निखीलच्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक खात्यात (Bank Account) पैसे जमा करण्यात आले.

तसेच सी. एस. बी. बँकेकडे आरटीजीएस करण्यासाठी अर्ज दिला. मात्र केवायसी अपडेटची अडचण असल्याने पैसे जमा झाले नाही. त्यानंतर निखील सहकुटुंब बेपत्ता झाला. त्यामुळे सायबर पोलिसांना (Cyber ​​Police) तक्रार करीत फायनान्स कंपनीने संशयिताचे बँक खाते गोठवले. त्यानंतर गंगापूर पोलिसांकडेही तक्रार केली. दरम्यान, निखीलने त्याच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे इतर बँक खात्यात वर्ग केल्याचे उघड झाले.

कंपनीच्या पैशांचा अपहार

अक्षय यांनी सी. एस. बी. बँकेत जाऊन निखीलने दिलेल्या सोने तारण पावतीची चौकशी केली असता निखीलने कोणत्याही प्रकारचे दागिने गहाण ठेवलेले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे निखील याने सोने तारण ठेवल्याची बनावट पावती व स्टेटमेंट दाखवून रुपीक फायनान्स कंपनीच्या पैशांचा अपहार केल्याचे उघड झाले. गंगापूर पोलीस तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...