Thursday, April 10, 2025
Homeक्राईमNashik Crime : जाधव बंधू हत्या कटातील सूत्रधाराचे नाशिकमार्गे 'वृंदावन दर्शन'; केला...

Nashik Crime : जाधव बंधू हत्या कटातील सूत्रधाराचे नाशिकमार्गे ‘वृंदावन दर्शन’; केला तीन हजार कि.मी. प्रवास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पुणे रोडवरील (Pune Road) आंबेडकरवाडीत रंगपंचमीच्या रात्री घडलेल्या जाधव बंधूंच्या हत्येतील (Jadhav Brothers Murder Case) कटात सहभागी असलेला संशयित योगेश गरड हा खून होताच नाशिक येथून रेल्वेमार्गे मुंबईने (Mumbai) वृंदावन, मथुरा आणि झाँशी येथे जाऊन लपला होता. साधारण चार ते आठ दिवसांत त्याने स्वतःला वाचविण्यासाठी सुमारे तीन ते चार हजार किलोमीटरचा प्रवास केल्याचे एसआयटीच्या (SIT) तपासात समोर आले. दरम्यान, त्याच्याकडे सखोल तपास सुरु असून पूर्वीच अटकेनंतर तुरुंगात असलेल्या पाच जणांचा ताबा एसआयटी घेणार आहे. तेव्हा हत्येचे नेमके कारण उलगडण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

बोधलेनगर येथील जाधव बंधूंच्या खुनाच्या गुन्ह्यात सहाव्या संशयितास नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik Police Commissionerate) विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन दिवसांपूर्वीच भक्कम पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. योगेश मधुकर गरड असे त्याचे नाव असून जाधव बंधूंच्या खुनासाठी रचण्यात आलेल्या कटात त्याचा प्रत्यक्ष सहभाग आढळला आहे. तसेच तो या खून प्रकरणात यापूर्वीच अटकेत असलेल्या सागर गरडचा भाऊ आहे.

रंगपंचमीच्या (दि. १९ मार्च) रात्री उमेश व प्रशांत या जाधव बंधूंवर संशयित सागर मधुकर गरड (३२, रा. आंबेडकर वाडी), अनिल विष्णू रेडेकर (४०, रा. उत्तरानगर), सचिन विष्णू रेडेकर (४४, रा. गायत्रीनगर), योगेश चंद्रकांत रोकडे (३०, रा. आंबेडकर वाडी), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशीरे (२६, रा. नवीन सिडको) यांनी कोयत्यासह धारदार हत्यारांनी हल्ला करुन निघृण खून केला होता. या गुन्ह्याच्या तपासावर आंबेडकरी समाज व कुटुंबाने संशय व्यक्त केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गुन्ह्याच्या पुर्नतपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.

दरम्यान, या एसआयटीचे प्रमुख गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके असून खून प्रकरणात आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरावे एसआयटीने संकलित केले आहेत. वरील संशयितांनी जाधव बंधूंच्या खूनाचा (Murder) कट रचला, त्यात योगेश हा सामील होता. त्याने संशयितांना पसार होण्यास मदत केली होती. तसेच, घटनेच्यावेळी तो जाधव बंधूंच्या बारीक हालचाली टिपत होता, असे उघड होत आहे.

सर्वच तिकिटे जप्त, पुरावे हाती

दोन्ही हत्या झाल्यानंतर पाच संशयितांपैकी सहावा संशयित योगेश हा नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पोहोचला. येथून मुंबईत गेला. तेथून त्याने पंजाब मेलने पुन्हा नाशिकमार्गे भुसावळ, भोपाळ, ग्वालियर, झाँशी, आग्रा व मथुरा गाठले. मथुरा स्थानकावरुन त्याने प्लॅटफॉर्म तिकिट काढून पुढील रेल्वेची चौकशी केली. यानंतर, तो वृंदावन येथे गेला. तेथून त्याने काशी गाठली. या सर्व प्रवासांत त्याने रेल्वेची तिकिटे काढली होती. ही सर्व तिकिटे एसआयटीने हस्तगत केली आहेत. त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.

प्रमुख मुद्दे

  • प्रत्यक्षदर्शीचे जाब जबाब नोंदविणे सुरु
  • घंटागाडी कामगाराकडे विचारणा
  • हत्त्येंच्या दिवशी वीज पुरवठा होता सुरळीत
  • संशयितांनी हत्त्यांसाठी वापरलेली दुचाकी वाहने केली जप्त
  • दोन्ही खुनांत रॉड, तलवार, कोयते, पहारीसाख्या हत्यारांचा वापर
  • मृतांवर खोलवर जखमा, कटात पाचहून अधिक संशयित
  • तुरुंगातील पाचही संशयितांना ताबा एसआयटी घेणार.
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Tahawwur Rana : २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा भारतात दाखल;...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai Terrorist Attack) आरोपी तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) अमेरिकेतून (America) राष्ट्रीय तपास संस्थेच्या...