Saturday, May 24, 2025
Homeक्राईमNashik Crime : एकोणवीस लाखांचा सुगावा लागेना; एटीएम मशीन चोरी व फोडीचे...

Nashik Crime : एकोणवीस लाखांचा सुगावा लागेना; एटीएम मशीन चोरी व फोडीचे बहुतांश गुन्हे ‘अनडिटेक्ट’

नाशिक | Nashik

- Advertisement -

अंबड परिसरातील (Ambad Area) एक्स्लो पॉईंट येथे खासगी बँकेचे एटीएम (ATM) मशीन गॅस कटरने कापून तब्बल १९ लाख रुपये चोरुन नेणाऱ्या चोरट्यांचा २४ तास उलटूनही सुगावा लागलेला नाही. चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत अनेक गंभीर घटना घडल्यावर काही गुन्हे दाखल होत त्यांचा तपासच होत नसल्याचे या निमित्ताने समोर येते आहे. दरम्यान, नाशिक शहरात सन २०१६ पासून २०२५ पर्यंत एटीएम मशीन पळवून नेण्यासह त्याच्यातील कॅश चोरुन नेल्याचे आठहून अधिक प्रकार घडले असून त्यातील दोनच प्रकरणांत संशयितांना अटक होऊन एका प्रकरणात शिक्षा मिळाली आहे.

अंबड हद्दीतील चुंचाळे चौकीच्या (Chunchale Area) अखत्यारितील एक्स्लो पॉईंट येथे बुधवारी (दि. २२) मध्यरात्री एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नसल्याची खात्री करुन व विद्युत पुरवठा खंडित असताना एटीएमबाहेरील कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे फवारुन आत प्रवेश केला. यानंतर आतील कॅमेऱ्यांचे नुकसान करुन गॅस कटरच्या साहाय्याने मशीनचे लोखंडी गार्ड व आतील ट्रे कापून त्यातून १८ लाख, ७६ हजारांची रोकड लंपास करुन पळ काढला. सकाळी एटीएमचा सुरक्षारक्षक ड्युटीवर आला असता ही घटना उघड झाली.

यानंतर बँकेच्या (Bank) वतीने मयूर संजय महाजन (रा. वृंदावन पार्क, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी फिर्याद नोंदविली. त्यानुसार, अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल असून तपास संथगतीने सुरु असल्याचे समजते. दरम्यान, यापूर्वी घडलेल्या अनेक एटीएम मशीन चोरी व त्यातील पैसे चोरीचा छडा लागला नसून बहुतांश सरकारी व खासगी बँकांच्या व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली असून बँक व्यवस्थापनांनी देखील शेकडो एटीएम सेंटरच्या सुरक्षेकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते.

दोनच गुन्ह्यांची उकल

२४ सप्टेंबर २०१९ रोजी सातपूर हद्दीतील खोडे पार्कमधील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडण्यात आले होते. तेव्हा धुळ्यातील भादा व कोळी टोळीला पोलिसांनी पकडले होते. यानंतर, मे २०२५ मध्ये न्यायालयाने या टोळीला मोक्कान्वये सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली तर, सन २०१८ मध्ये पुणे रोडवरील परिमंडळ दोनच्या तत्कालिन पोलीस उपायुक्त कार्यालयासमोरील एटीएम चोरट्यांनी फोडले होते. त्यानंतर दहा दिवसांत संशयितांना गजाआड करण्यात आले होते.

या गुन्ह्यांचा तपासच नाही

उपनगर भागातील शिवाजीनगर भागात सप्टेंबर २०१६ मध्ये स्टेट बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडून तीन लाख रुपये लांबविले होते. या गुन्ह्याचा अद्याप तपास पूर्ण नसून पुणे रोडवरील तत्कालीन पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळील गुरुदेव आपार्टमेंटमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये शिरुन चोरट्यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये वीस मिनिटांत २८ लाख रुपये लंपास केले होते. तर, याच भागातील मंजुळा मंगल कार्यालयाजवळील एटीएम मशिन फोडल्याची घटना सन २०१५ पूर्वी घडली होती. तसेच सामनगाव रोडवरील केंद्रीय सुरक्षा दलाच्या मैदानाजवळील एटीएम मशिन चोरट्यांनी पिकअप वाहनात टाकून पळवून नेल्याची घटना जुलै २०२३ मध्ये घडली होती. त्याशिवाय मार्च २०२५ मध्ये मुंबईनाका नाका हद्दीतील एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही कॅमेरे जाळून चोरट्यांनी मशीन चोरुन नेले. या सर्वच घटनांचा तपास अपूर्ण आहे.

एकाच ठिकाणी तिसरी घटना

उपनगर हद्दीत एका एटीएममधून चोरट्यांनी दोनदा रोकड लंपास केली होती. त्याचाही तपास झाला नसून एटीएममधील ट्रेमध्ये कॅश लोड केल्यानंतर दोन ते दिवसांच्या आतच चोरट्यांनी रक्कम व मशीन चोरी केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

महामार्गावर

राज्य महामार्गावर ‘या’ गाड्यांची टोलपासून मुक्तता होणार; समृध्दी महामार्ग, शिवडी-न्हावा शेवा...

0
मुंबई | Mumbai पेट्रोल, डिझेलच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाढणाऱ्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांचे उत्पादन व वापराला मोठ्या प्रमाणावर चालना...