नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबडच्या (Ambad) महालक्ष्मीनगर येथील सराफी पेढीतून दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवून १५ लाखांचे दागिने लुटणाऱ्या तिसऱ्या संशयिताला (Suspected) गुंडा विरोधी पथकाने हरियाणातील करनाल येथून अटक (Arrested) केली आहे. या दरोड्यातील तीनही संशयिताना पोलिसांनी (Police) अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नरेंद्र हरीराम अहिरराव (जि. किरवाडा गाव, सागर, मध्यप्रदेश) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. श्री ज्वेलर्स ही सराफी पेढी लुटणारा गुन्ह्यातील मुख्य संशयित सागर जिल्ह्यात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळाली होती. हे पथक मध्य प्रदेश येथे संशयिताच्या मागावर रवाना झाले होते. यानंतर संशयित चोरटा मध्यप्रदेश येथून दुसऱ्या राज्यात (State) गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीताची माहिती घेतली असता तो हरियाणा येथे असल्याचे समजले.
दरम्यान, यानंतर पथकाने हरियाणा (Haryana) येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कामानिमित्त भाडोत्री राहणाऱ्या मध्यप्रदेशातील काही लोकांची माहिती काढली. संशयिताबाबत चौकशी केली असता पहाटे ४ वाजेच्या सुमारास ताे शिवपुरी रोड, करनाल येथे असतानाच सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. गुंडाविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत आदींसह पथकाने केली आहे. पुढील तपासासाठी त्याचा ताबा अंबड पोलिसांकडे देण्यात आला आहे.