Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमNashik Crime : सवतीने काढला पतीचा काटा; सावत्र बहिणीची भावांविरोधात फिर्याद

Nashik Crime : सवतीने काढला पतीचा काटा; सावत्र बहिणीची भावांविरोधात फिर्याद

हिंदुस्थाननगरात फेरीवाल्या कुटुंबांत राडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दुहेरी विवाह (Marriage) केलेल्या रस्त्यावरील खेळणी विक्रेत्या पतीचा (Husband) दुसऱ्या पत्नीने मूलबाळ होत नाही, या कारणातून दोन सख्ख्या भावांच्या मदतीने जबर मारहाण करतानाच चाकूने वार करुन निर्घुण खून (Murder) केला. ही घटना आडगाव पोलिसांच्या हद्दीतील हिंदुस्थाननगरातील सिल्व्हर ओक हाऊसमागे (दि. १७) रात्री आठ वाजता घडली. याबाबत सवत पत्नीसह तिच्या भावांवर आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भावसार मुलचंद पवार उर्फ बाल्या (वय ४५, रा. खिसकुली सर्कल, अटलादरा, बडोदरा, गुजरात) असे मृत विक्रेत्या पतीचे नाव आहे. बत संशयित सवत पत्नी सुनीता नागेश शिंदे, याबाबत तिचे भाऊ राज नागेश शिंदे, आदित नागेश शिंदे (सर्व रा. हिंदुस्थाननगर, आडगाव) दीपक आणि अनोळखी संशयित (Suspected) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत मृत भावसार याची पहिली पत्नी नीरमा पवार (वय ३०) हिने फिर्याद नोंदविली आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी नीरमा ही पती भावसार आणि अकरा वर्षीय मुलगी आलम हिला घेऊन गुजरात येथून आडगाव शिवारातील हिंदुस्थाननगरात राहणाऱ्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी भावसारची दुसरी पत्नी व नीरमाची सवत सुनीता हिने भावसारशी विवाह केल्यासह मूलबाळ होत नाही, या कारणातून सकाळपासून भांडण सुरु केले. यावेळी सुनिताचे भाऊ राज आणि आजी, आदित, दीपक आणि अनोळखी संशयिताचा पोलीस (Police) शोध घेत आहे.

सवत सावत्र की सख्खी बहीण?

भावसारची पहिली पत्नी नीरमा व सुनीता या सख्या बहिणी आहेत, असे तपासात समोर आले असून भावसारने वेगवेगळ्या कालावधीत दोघींशी विवाह केला होता. मात्र, दुसरी पत्नी सुनिता ही मूलबाळ होत नसल्याने संतापात होती. त्यावरून तिने अनेकदा भावसार गुजरात (Gujarat) येथे वास्तव्यास असतानाही तिथे जाऊन वाद घातले होते. आता या वादात तिच्या भावांनी बाजू घेत दाजीचा काटा काढला.

पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीने केली हत्या

पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीने ही हत्या केली असल्याचे समोर येत आहे. नीरमाची सावत्र बहीण सुनिताशी विवाह केल्यावर भावसार नाशिकला (Nashik) न येता पहिल्या पत्नीसह गुजरातलाच राहत होता. विवाह केल्यावर तिला मूलबाळ नसल्याने व अन्य वादातून ती भावसार यांच्याशी सतत भांडण करत असत. दोन दिवसांपूर्वीच सुनिता ही भांडण करून हिंदुस्थान नगर, आङगाव शिवार येथे माहेरी आली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या