नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटी आणि आडगाव हद्दीत (Panchvati and Aadgaon Area) चाेरट्यांनी (Thieves) धाडसी घरफाेडी करुन लाखाे रुपयांचा ऐवज चाेरुन नेला आहे. आदीत्य दीपक पाटील (२३, रा. साईकलश अपार्टमेंट, पंचवटी. मूळ रा. दुगाव, ता. चांदवड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. १२) पाटील हे परगावी असता, मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून १ लाखांची रोकड चोरून नेली.
तसेच त्याच मजल्यावर राहणाऱ्या प्रांजली सुधाकर शेवाळे यांच्या बंद फ्लॅटचाही कडीकोयंडा तोडून ७० हजारांचे सोन्याचे (Gold) मंगळसूत्र, १५ हजारांची रोकड, तर प्रवीण मधुकर शेजवळ यांच्या बंद फ्लॅटचाही कडीकोयंडा तोडून ५ हजारांची रोकड, २५ हजारांची लहान मुलांचे सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख १५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. पंचवटी पोलिसात (Panchvati Police) घरफोडीचा गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.
तर, आडगाव हद्दीतील कोणार्कनगर येथे रोहित दिगंबर बर्वे (३५, रा. कोणार्कनगर, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, १९ एप्रिल ते ५ मे या दरम्यान त्यांचे राजलक्ष्मी कॉलनीतील शिव- रो हाऊस ते गावी गेले असल्याने बंद होते. याच दरम्यान चोरट्यांनी संधी साधून बंद रो हाऊसचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि १ लाखांच्या रोकडसह ३५ हाजरांचे सोन्याचे दागिने व २५ हजारांची अंगठी असा १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. आडगाव पोलिसात (Aadgaon Police) गुन्हा दाखल असून, हवालदार बनकर तपास करीत आहेत.