Thursday, January 29, 2026
Homeक्राईमNashik Cyber Crime : लसणाच्या झोलचा सायबर ट्रेन्ड; चोरट्यांनी दाखविले नाशिकमधील एक्स्पोर्टरला...

Nashik Cyber Crime : लसणाच्या झोलचा सायबर ट्रेन्ड; चोरट्यांनी दाखविले नाशिकमधील एक्स्पोर्टरला आमिष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हायपो ऑईलनंतर सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) आता सेंद्रीय लसूण पावडरच्या नावे नवीन दुकानदारी सुरु केल्याचे समोर आले आहे. याच माध्यमातून नाशिक शहरातील (Nashik) एका फूड प्रोसेसिंग एक्सोपोर्टरकडून चोरट्यांनी सेंद्रीय लसूण पावडर जादा दराने खरेदी करण्याचे आमिष दाखवून साडेआठ लाख रुपये उकळले आहेत. दरम्यान, पैसे (Money) देऊनही पावडर मिळाली नसल्याने फसवणूक झाल्याचे समजताच एक्सपोर्टरने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली आहे. नाशिक शहरात अशा स्वरुपाची ही सहावी घटना आहे.

- Advertisement -

शहरात ५९ वर्षीय व्यक्ति नुकताच फूड प्रोसेसिंग व एक्सपोर्टच्या व्यवसायात जम बसवत होता. अशातच त्याला सायबर चोरट्यांनी ४ जून ते ७ जुलै २०२५ या कालावधीत तक्रारदाराला व्हॉट्सअॅप क्रमांक (२२८७१५४५०८८, ४४७४२९९१७०८२) आणि जी मेल अकाउंट infovandanimal.com वरुन संपर्क साधला. तेव्हा त्याने त्याची ओळख ‘मी वँड अॅनिमल आयएनसी टोगो’ या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले.

YouTube video player

यानंतर, आमची कंपनी तुमच्या ‘विनीत फुड्स अॅन्ड अग्रो एक्सपोर्टस्’ या कंपनीकडून दरमहा एक लाख ९० हजार रुपये प्रति किलो दराने शंभर किलो गार्लिक (लसूण) ऑर्गनिक पावडर खरेदी करण्यास तत्पर असल्याचे सांगितले. मात्र, तत्पूर्वी त्याला जादा नफ्यासह व्यवसायातील सूत्र पटवून दिले. त्यानुसार, सायबर चोरट्याने आधी तुम्हाला पाच किलो सेंद्रीय लसणाची पावडर आमच्या कंपनीचे भारतातील (India) सिक्किम येथील लोकल सप्लायर एसएम इंटरप्रायजेस यांच्याकरवी ८ लाख ६४ हजार रुपयांना खरेदी करावी लागेल, असा विश्वास संपादन केला.

दरम्यान, एक्सपोर्टरने नफा व जास्तीचे पैसे मिळतील, या लालसेने ८ लाख ६४ हजार रुपये पावडर खरेदीसाठी संशयिताच्या सांगण्यानुसार विविध बँक खात्यांत वर्ग केली. मात्र, खरेदीनंतर त्याला कोणत्याही पत्त्यावरुन लसणाची पावडर मिळालीच नाही. फसवणूक (Fraud) झाल्याचे समजताच त्याने सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करत आहेत.

अशी होते फसवणूक

सायबर चोरटे संबंधितांशी संपर्क करुन एका नामांकित इंडस्ट्रीसह कंपनीचे लोगो व नाव वापरुन ओळख देतात. प्रॉडक्टबद्दल माहिती देऊन होलसेल चेनच्या माध्यमातून व्यवसाय विस्तारण्यासाठी अनेक स्किम सांगतात. एखाद्याला कमी किमतीत ऑईल व लसणाची पावडर खरेदी करण्यास भाग पाडून नंतर हीच पावडर किंवा वस्तू आमची कंपनी जास्त दराने (किमतीत) खरेदी करेल, असे आश्वासन व तशी कागदपत्रे ऑनलाईन पाठवितात. पैसे मिळतात, संशयितांचा नंबर बंद होतात. पैसेही परत मिळत नाहीत. अनेकदा बनावट पावडर व ऑईल पाठविले जाते. तपासणीअंती फसवणुकीचा उलगडा होतो.

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...