नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करुन स्थानिकांसाेबतच बाहेरील संशयितांनी (Suspect) नाशिककरांसह एका कंपनीस एकूण ७८ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत आडगाव, भद्रकाली व मुंबईनाका पाेलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचे (Fraud) तीन स्वतंत्र गुन्हे नाेंदविण्यात आले आहेत.
तीन काेटींचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून तिघांनी ग्राहकाकडून तीन लाख ४४ हजार रुपये उकळले. कर्ज मंजूर न हाेताच, दिलेली रक्कम परत मिळत नसल्याने उमेश रामदास ढाेकळे(वय ४५, रा. पंचवटी) यांनी आडगाव पाेलीस ठाणे गाठून संशयित राकेश देशपांडे, गणेश करचे व जितेंद्र शर्मा यांच्याविराेधात फिर्याद (FIR) दाखल केली आहे.
संशयितांनी ढाेकळे यांना तीन काेटी रुपयांचे कर्ज (Loan) सेवा फायनान्शिअल सर्व्हिसेसमार्फत देण्याचे कबूल करत २७ ऑक्टाेबर ते २६ नाेव्हेंबर २०२४ या कालावधीत त्यांच्याकडून फाेन पे व अन्य डिजिटल प्लँटफाॅर्मवरुन तीन लाख ४४ हजार रुपये उकळले. याबाबत सहायक उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
तर, माेबाईलवरील संबंधित व्यवहाराचा काेणताही ओटीपी शेअर केला नसतानाही एका व्यक्तिच्या बँक खात्यातील तीन लाख आठ हजार रुपये उत्तर प्रदेशातील कसना येथील इंडियन बँकेच्या संशयित खातेदाराने वर्ग केल्याचा प्रकार द्वारका येथील काठे गल्ली भागात घडला. याबाबत मनीष माेतीराम सानप(वय ५०, रा. ओम् कार काॅलनी) यांनी भद्रकाली पाेलीस ठाण्यात फिर्याद नाेंदविली आहे.
मनीष हे २९ नाेव्हेंबर २०२४ राेजी ओमकार काॅलनीत हाेते. तेव्हा, त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यातून तीन लाख आठ हजार रुपये कसना येथील संशयित व्यक्तिच्या बँक खात्यात वर्ग झाले. सानप यांनी काेणताही ओटीपी शेअर न करता हे पैसे वर्ग झाल्याने आश्चर्य व्यक्त करत पैसे परत मिळावेत, यासाठी पाेलीसांकडे (Police) फिर्याद नाेंदविली आहे. तपास पाेलीस निरीक्षक माेहिते करत आहेत.
इन्शुरंन्सचे पैसे लाटले
शहरातील स्टर्लिंग माेटर्सला इन्शुरंन्स कंपन्यांनी पाठविलेला ‘अतिरिक्त बिझनेस बाेनस’ स्टर्लिंग कंपनीत काम करणाऱ्या संशयिताने संगनमताने स्वत:सह नातलगांच्या बँक खात्यात जमा करुन कंपनीस ३७ लाख १९ हजारांचा गंडा घातला आहे. याबाबत मुंबईनाका पाेलीस ठाण्यात कंपनीच्या वतीने विवेक गाेपाल माथूर (रा. वाकड, पुणे) यांनी फिर्याद नाेंद केली आहे. त्यान्वये, संशयित कर्मचारी महेष शालीग्राम राठी(रा. पाैर्णिमा अपा. भागवतनगर, नागपूर) याच्यावर गुन्हा नाेंद झाला आहे. राठी याने गडकरी चाैकातील स्टर्लिंग माेटर्समध्ये सन जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत कार्यरत असताना, कंपनीस मिळणारा अतिरिक्त बाेनस गैरमार्गाने हडप केला. है पैसे त्याने संशयित आई शकुंतला, नातलग शितल चावला, भाचा पार्थ प्रशांत मुंदडा, बहिण माधुरी प्रशांत मुंदडा, मुलगा देवांश यांच्या बँक खात्यात वर्ग करुन फसवणूक करत अपहार केला. तपास सहायक निरीक्षक वाघ करत आहेत.