Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : ट्रक चाेरीचा बनाव; चालकाने परस्पर विल्हेवाट लावून केली विक्री,...

Nashik Crime : ट्रक चाेरीचा बनाव; चालकाने परस्पर विल्हेवाट लावून केली विक्री, तिघे ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भंगाराच्या मालाने भरलेला ट्रक चोरी (Truck Theft) झाल्याचा बनाव करत त्याची परस्पर विल्हेवाट लावून भंगार विक्री केल्याची घटना गुन्हे शाखा युनिट एकच्या (Unit One) पथकाने उघडकीस आणली आहे. ट्रकमालकाच्या संगनमताने ट्रकचालकाने हा गुन्हा दाखल केल्याचे उघडकीस आले आहे. संशयित दोघांसह ट्रकचालक साेनू उर्फ फरहान यास मुंबईनाका पोलिसांच्या (Mumbai Naka Police) ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisement -

वडाळानाका येथील सर्व्हिस रोड भागातून ३ एप्रिलला रात्री १०.३० वाजता ट्रक चोरीस गेल्याची फिर्याद मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल आहे. चोरीस गेलेल्या ट्रकमध्ये १२ लाख रुपयांचे भंगार साहित्य होते. तपास करताना युनिट एकचे श्रेणी उपनिरीक्षक रवींद्र बागुल व हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमालकानेच चालकासोबत संगनमत करून चोरीचा बनाव केल्याचे समजले. त्यासाठी इतरांनी मदत केली. दरम्यान, या गुन्ह्यातील दोन संशयित राजस्थान येथून मालेगावच्या (Malegaon) दिशेने येत असल्याची माहिती पथकास कळाली.

त्यानुसार युनिट एकचे प्रभारी मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. हवालदार काठे, प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, नाझीमखान पठाण, नाईक विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी व अमोल कोष्टी यांनी धुळे जवळील लळिंग टोलनाका (Toll Booth) येथून खासगी बसमधून ताब्यात घेतले. त्यात सालीम रशीद शेख (१८, रा. द्वारका) व नाविद आरीफ शेख (२१, रा. साठेनगर, वडाळा) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता ट्रकमालक साहिल हनिफ शेख (२७, कथडा) याच्या सांगण्यावरून ट्रक चोरीचा बनाव करीत भंगार साहित्य विक्री केल्याची कबुली दिली.

दरम्यान, ट्रकचालक सोनु उर्फ फरहान याच्या मदतीने संशयितांनी ट्रक स्क्रॅप केला. त्यानंतर ट्रकच्या स्क्रॅपसह ट्रकमधील भंगार माल जालना येथील भाग्यलक्ष्मी कंपनीत (Company) विक्री केला. त्यामोबदल्यात मिळालेल्या ७ लाख रुपयांपैकी ३ लाख रुपये सालीम शेख यास मिळाले. गुन्हे शाखेच्या पथकाने ते पैसे जप्त केले आहेत. 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...