Monday, May 5, 2025
Homeक्राईमNashik Crime : प्रवासी वाहनांत सर्रास घरगुती गॅस; अवैध रिफिलिंग अड्डा उद्ध्वस्त

Nashik Crime : प्रवासी वाहनांत सर्रास घरगुती गॅस; अवैध रिफिलिंग अड्डा उद्ध्वस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरासह जिल्ह्यांत धावणाऱ्या विविध प्रवासी वाहनांत सर्रास घरगुती गॅसचा (Gas) इंधन म्हणून वापर सुरु आहे. बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा काळाबाजार करणा-या तिघांना युनिट दोनने (Unit Two) ताब्यात घेऊन या अवैध व्यवसायाचा भांडाफोड केला. टाकलेल्या छाप्यात (Raid) सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नाशिकरोड भागातील जियाउद्दीन डेपोजवळील भारती मठाजवळ शनिवारी (दि. ३) करण्यात आली.

- Advertisement -

शिवा दिनेश लोणारे (वय २०, रा. राजवाडा, मालधक्कारोड, नाशिकरोड), शाकीर मोहम्मद शहा (वय २५) आणि नवाझ अहमद शहा (वय २१, दोघे रा. सुदरनगर झोपडपट्टी, देवळालीगाव) अशी संशयितांची नावे आहेत. शहरात अवैधपणे गॅस सिलेंडरमधून मोटार व मशिनद्वारे गॅस खासगी वाहनांमध्ये (Vehicles) भरला जात असताना सहायक उपनिरीक्षक बिलास गांगुर्डे यांना भारती मठाजवळील शेडमध्ये गॅस रिफिलिंग सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती युनिट दोनचे प्रभारी हेमंत तोडकर यांना कळविली.

यानंतर तोडकर यांनी वरिष्ठांच्या सूचनेने पथकासह छापा टाकला. तेव्हा संशयित भारत गॅसच्या घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदेशिर रित्या मशिनद्वारे खासगी वाहनांत भरताना आढळून आले. ही कारवाई (Action) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने हेमंत तोडकर, श्रेणी उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी, हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, अंमलदार सुनिल खैरनार, प्रविण वानखेडे यांनी केली.

पोलीस ठाण्याला दिसलाच नाही अड्डा

नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा अवैध गैस रिफिलिंग अड्डा सुरु होता. अनेक महिन्यांपासून राजरोज सुरु असलेला हा अड्डा पोलीस ठाणे प्रभारी व गुन्हेशोध पथकाच्या लक्षात कसा आला नाही की कृपाशीर्वादाने सुरु होता, याची चर्चा सुरु झाली आहे. पोलीस ठाणे व त्यांचे गुन्हेशोध पथक कार्यरत असताना अकार्यकारी शाखेला कारवाई करण्याची वेळ आल्याने नाशिकरोड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त केली जात आहे.

६३ टाक्या जप्त

या अड्‌ड्यातून पोलिसांनी ६३ छोटेमोठे गॅस सिलेंडर, ३ मोटार व ३ वजन काटे व रोख रक्कम असा एकूण २ लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हवालदार प्रकाश बोडके यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित अनुचालकांवर बीएनएस कलमांसह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व. ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : जाधव बंधू हत्या प्रकरण; हत्येतील तीन कोयते हस्तगत

0
नाशिक | Nashik पुणेरोडवरील आंबेडकरवाडीत उमेश व प्रशांत जाधव या सङख्या भावांचा खून (Brother Murder) करण्यासाठी वापरलेले तीन धारदार कोयते (Scythe) एसआयटीने (SIT) जप्त केले...