Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Crime : नोकरी देण्याचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा

Nashik Crime : नोकरी देण्याचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्टेट बँक ऑफ इंडियात (State Bank of India) नोकरी (Job) देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी गरजवंताकडून १५ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

- Advertisement -

महादेव मल्हारी, दिनेश तांबे, दिलीप भानुशाली अशी संशयितांची नावे आहेत. मिलिंद धर्माजी जाधव (६२, रा. वझरेनगर, गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी (Suspect) संगनमताने मुलास स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी जाधव यांच्याकडून १५ लाख रुपये उकळले.

दरम्यान, त्यानंतर नोकरीची बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केली. हा प्रकार २०२१ ते २०२४ या दरम्यान घडला. संशयितांनी त्यांचे पैसेही परत केले नाहीत. मुंबई नाका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा (Case) दाखल आहे.

चाेरीचे साहित्य हस्तगत

मेळा बसस्थानकाच्या आवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या पिशवीतून चाेरी केलेले पितळाचे भांडी व मूर्ती जप्त केले आहे. गंगूबाई रामनाथ सोनवणे (५५, रा. सुमननगर, लासलगाव) असे संशयित महिलेचे नाव आहे. गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या महिला हवालदार कोकणी यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी(दि. ६) पथक मेळा बसस्थानकावर सायंकाळी गस्तीवर असताना संशयित महिला संशयास्पद हालचाली करताना आढळल. तिच्या पिशवीची झडती घेतली असता, त्यात पितळाची भांडी, पितळाची गाय-वासराची मूर्ती, पितळाची समई असे आठ हजारांचे साहित्य जप्त केले. सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे.

ताज्या बातम्या

Shivsena UBT MP Meeting : ‘मातोश्री’वरील बैठकीला कोणत्या खासदाराची उपस्थिती अन्...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ठाकरे सेनेचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या...