नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काठेगल्ली भागात कार डेकोर व्यावसायिकाचे (Businessman) त्याच्याच कारमध्ये बसून दोघा संशयितांनी (Suspected) बंदुकीच्या धाकाने अपहरण (Kidnapping ) करत निर्जनस्थळी नेत हवेत गोळीचार करून १५ लाख रुपयांची खंडणी उकळली होती. हा गुन्हा घडून ७२ तास उलटूनही खंडणीखोरांचा शोध अद्याप लागलेला नाही. या गुन्ह्याच्या आतापर्यंतच्या तपासात युनिट एकने तिघा संशयास्पद तरुणांची (Youth) चौकशी केली असता, त्यांच्याकडून ठोस पुराचा मिळाला नाही. त्यामुळे चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. तर, आता फिर्यादी व्यावसायिकाकडे सखोल चौकशी केली जात असून अपहरणाचा हा बनाव रचण्यात आला का, ही शंका पडताण्यासाठी तांत्रिक विश्लेषणावर भर देण्यात आला आहे.
निखील प्रदीप दर्यानानी (वय २७, रा. ओझोन अपार्टमेंट, टाकळी रोड, उपनगर) या कारडे कोर व्यावसायिकाच्या फिर्यादीनुसार, (दि. ४) दुपारी सव्वातीन वाजता तो क्रेटा कारने (एमएच १६ सीई २०२०) पुणे रोडवरील (Pune Road) काठेगल्ली सिग्नल येथून जात होता. कार थांबली असतानाच दोघा संशयितांनी कारच्या काचेवर धक्का मारुन ‘काहीतरी बोलायचे आहे, असे सांगितले. तेव्हा निखिलने अनोळखी संशयितांना कारमध्ये बसविले. कार नासर्डी नदीच्या पुलाजवळ आली असतानाच संशयितांनी निखीलला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली व एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यानंतर, बंदुकीच्या धाकावर संशयितांनी निखीलला घोटी नाका व कळसूबाई शिखराकडे जाणाऱ्या रोडने निर्जन ठिकाणी नेले व गाडीच्या खाली उतरवून बंदुकीतून हवेत व जमिनीवर गोळीबार केल असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, गोळीबार (Firing) होताच निखील घाबरल व त्याने भाऊ नवीन याला फोन करून बलेनो कार घेऊन येणाऱ्या तिसऱ्या संशयितास पंधरा लाख रुपये देण्यास सांगितले. हे पैसे ताब्यात येताच, दोघे संशयित निखिलला गाडीत बसवून नाशिककडे आले. येथील सेव शोरुमजवळ निखिलने संधीच फायदा घेत जीव वाचवून पन काढला होता. सिनेस्टाईल घडलेल्या या अपहरणाच्य प्रकारामुळे पोलिसांनी सखोल तपास केला असता त्यांना काही बाबी संशयास्पद आढळल्या आहेत. त्यानुसार, आता तपास सुरु झाला आहे.
मुद्दे
- तिघांच्या शोधार्थ टीम खाना
- निखिलची कार जप्त
- घटनाक्रम संशयास्पद, बनाव आहे की नाही त्यादृष्टीने ही तपास
- फिर्यादीतील माहिती व चौकशीतील माहितीत विसंगतीचा संशय
- निखिलसह भावाकडे व कुटुंबाकडे चौकशी
- फायरिंग झालीच नसल्याचा पोलिसांचा दावा
- ६० किलोमीटरपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी