Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : सराईताच्या खून प्रकरणी तिघे संशयित ताब्यात

Nashik Crime : सराईताच्या खून प्रकरणी तिघे संशयित ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नववर्षाचे स्वागत सुरु असतानाच मंगळवारी उंटवाडी रस्त्यावर चार संशयितांनी (Suspected) सराईत गुन्हेगारासोबत ‘ओली पार्टी’ रंगवून त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास त्याची निघृण हत्या केली. लक्ष्मण गारे (वय ३४, रा. क्रांतिनगर, उंटवाडीरोड) असे मृताचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकने बारा तासांत तीन संशयितांना अटक (Arrested) केली असून मुंबई नाका पोलिसांत चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद आहे. शहर सेलिब्रेशन मोडवर असतानाच उंटवाडी रस्त्यावर झालेल्या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी शुभम विठ्ठलराम मिरके (वय २१), अरुण बाळू वळवी (२१), रिझवान रईसउद्दीन काझी (२९, सर्व रा. क्रांतीनगर) या संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचा चौथा साथीदार गणेश भावसार पसार असून, पोलिस पथके त्याच्या मागावर रवाना झाली आहेत. दरम्यान, रात्री अकरा वाजेच्या सुमारास चारही संशयितांनी सराईत गुन्हेगार लक्ष्मण गारे याला क्रांतिनगरातून बोलावून घेत ‘ओली पार्टी’ केली. मद्याच्या नशेत संशयितांनी गोरे याला बळजबरीने मोपेड वाहनावर बसविले. त्यानंतर उंटवाडी रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या संरक्षण भिंतीलगत मोकळ्या जागेत नेले. तिथे गोरेला बेदम मारहाण करीत डोक्यात दगड टाकून ठार (Killed) मारले.

दरम्यान, याप्रकरणी दीपक गणपत गारे यांच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिसात बुधवारी (दि. १) पहाटे खुनाचा गुन्हा दाखल झाला. माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मुंबई नाकाचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे यांच्या पथकाने (Squad) घटनास्थळी धाव घेतली. युनिट एकच्या पथकाने संशयितांचा माग काढला. संशयित हे पंचवटीतील फुलेनगरमध्ये असल्याची माहिती मिळताच सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, नाझीम पठाण, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, अप्पा पानवळ यांनी संशयितांना पकडले.

भावाच्या वाढदिवशी शोक

लक्ष्मण गारे याचा हत्या (Murder) झाली, तेव्हा त्याच्या भावाचा वाढदिवस होता. गारे कुटुंबीय ‘थर्टी फर्स्ट’ सह वाढदिवसाचे सेलिब्रेशन करीत असताना लक्ष्मणचा खून झाल्याने क्रांतिनगरात एकच खळबळ उडाली. भावाच्या वाढदिवशी संशयितांनी गुन्हेगाराचा ‘काटा’ काढल्याने पोलिसांनीही अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...