Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : पन्नास लाखांसाठी गर्भवतीला लाथा; तीन पीडितांनी दिल्या सासरच्या मंडळींविरोधात...

Nashik Crime : पन्नास लाखांसाठी गर्भवतीला लाथा; तीन पीडितांनी दिल्या सासरच्या मंडळींविरोधात फिर्यादी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरण (Suicide Case) चर्चिले जात असतानाच नाशिकमधील (Nashik) तिघा वेगवेगळ्या विवाहितांनी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर, सातपूर व नाशिकरोड पोलिसांत (Nashik Road Police) विवाहिता छळाचे तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एका प्रकरणातील पीडितेस संशयित पतीने गर्भवती असतानाही पोटात लाथा मारुन छळ केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

पहिल्या गुन्ह्यातील पीडितेच्या फिर्यादीनुसार ती २००७ ते २१ सप्टेंबर २०२३ पर्यंत देवळाली कॅम्प व लॅमरोड भागातील नांदत असताना पतीने (Husbend) क्षुल्लक कारणातून वाद घालून छळ केला. तर, ‘नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वडिलांकडून पन्नास लाख रुपये आणावेत’, अशी मागणी केली. त्याने तगादा लावला असता तिने नकार दिला. तेव्हा संशयिताने छळ सुरु ठेवत पीडितेचे आठ लाख रुपयांचे दागिने, हिऱ्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट काढून अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे (Gangapur Police Station) उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

YouTube video player

तर, सातपूर परिसरातील (Satpur Area) विवाहितेचा तिच्या सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत कालांतराने तिला घरातून हाकलून दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. २७ एप्रिल २०१८ ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ती ठाणे जिल्ह्यातील (Thane District) रेतीबंदर भागातील सासरी नांदतांना सासरकडील तीन पुरुष व तीन महिलांनी तिला उपाशीपोटी ठेवून पैशांची मागणी केली. यानंतर तिला हाकलून दिले. सातपूरचे हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत.

तिसऱ्या घटनेत पुणे जिल्ह्यातील (Pune District) हवेली पोलीस स्टेशनजवळील सासरी नांदणाऱ्या पीडितेने सासरच्यांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार २४ फेब्रुवारी २०२३ ते ६ जून २०२५ या कालावधीत तिला सासरच्या तीन महिला व पुरुषांनी संगनमत करुन क्रूर वागणूक दिली. ती गर्भवती असताना तिला सार्वजनिक नळावरुन तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेत पिण्याचे पाणी भरुन आणण्यास भाग पाडले. तर स्वतःचा खर्च करण्यासह दवाखान्याचे पैसे आई-वडिलांकडून आणण्यास सांगितले. तसेच मुलगा झाल्यास तो नणंदेला द्यावा असे म्हणून पती प्रशांत याने काहीतरी कारणातून पत्नी गर्भवती असतानाही तिच्या पोटात लाथा मारुन छळ केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...