नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सराईतास अटक (Arrested) करण्यासाठी गेलेल्या गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकावर हल्ला (Attack) करणाऱ्या सोनवणे कुटुंबातील स्नॅचर किरण याच्यासह साथीदाराकडून सोनसाखळी चोरीचे (Gold Chain Stolen) तब्बल २० गुन्हे उघड झाले आहेत. किरणने साथीदार योगेश गायकवाड याच्या मदतीने विनानंबर प्लेटच्या दुचाकींवरुन येत दागिने परिधान केलेल्या महिलांना (Women) लक्ष करत त्यांचे मंगळसूत्र ओरबाडले आहेत. त्यानुसार दोघांकडून २२ तोळे सोने, एक गावठी कट्टा, दुचाकी असा १८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
किरण छगन सोनवणे (वय ३८, रा. अश्वमेघनगर, आरटीओजवळ, पंचवटी) असे सराईताचे नाव असून त्याच्यावर एकूण घरफोडी, चोरी, सोनसाखळी खेचण्याचे एकूण ४१ गुन्हे नोंद आहेत. तर, त्याचा साथीदार योगेश दत्तू गायकवाड (वय २८, रा. सिन्नर) याच्यावर नाशिक येथे चेनस्नॅचिंगसह हैदराबाद व संगमनेर येथे गांज्या तस्करीप्रकरणी एनडीपीएसचे गुन्हे नोंद आहेत. दोघांकडे अधिक तपास सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात (City) सोनसाखळी ओरबाडून नेण्याच्या घटनांत वाढ झाली होती.
त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या अधिनस्त सहायक निरीक्षक हेमंत तोडकर व उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि पथक तपास करत होते. त्याचवेळी तांत्रिक विश्लेषणानुसार, किरण सोनवणे याचा सहभाग उघड झाला. त्याला पकडण्यासाठी पथक (दि. ७) त्याच्या घरी गेले असता, त्याने काहूर माजवित पळून जाण्याचा प्रयत्न केला, तसेच त्याच्या कुटुंबाने पथकाशी हुज्जत घातली.
दरम्यान, याचवेळी किरण याने गावठी कट्टा पोलिसांवर ताणून फायर करण्याचा प्रयत्न केला, पण कट्टा नादुरुस्त झाल्याने गोळीबार झाला नाही. अखेर पोलिसांनी (Police) त्याच्यावर नियंत्रण मिळवित त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, सर्वच चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांत किरणचा साथीदार योगेश गायकवाड याचा शोध घेण्यात आला. पथकाने सिन्नरफाटा येथील मार्केट यार्डजवळ सापळा रचून त्याला पकडण्यात आले. दोघांकडे विचारणा केली असता त्यांनी म्हसरुळ, पंचवटी, आडगाव व अन्य ठिकाणच्या हद्दीत तब्ब्ल २० चेनस्नॅचिंग, एक दुचाकी चोरी व घरफोडी केल्याची कबुली दिली.
जेलमधून ओळख
किरण व योगेश आणि त्यांचे पसार असलेले साथीदार हे सराईत असून त्यांची ओळख कारागृहात झाली. तेथून त्यांनी केवळ चेनस्नॅचिंगचा धडाका सुरु केला. या व इतर गुन्ह्यांत सहभागी संशयितांचा शोध सुरु असून किरण व गायकवाडने चेनस्नॅचिंगच्या पैशातून मौजमजा केली असून त्यांनी सोने विक्रीतून ४०/६० टक्के वाटा होता.
किरण पूर्वाश्रमीचा घरफोड्या
किरण सोनवणे हा पंचवटीतील अट्टल चोरटा आहे. त्याने सन २०१० ते २०१८ या आठ वर्षांत येवला शहर, लासलगाव, पंचवटी, म्हसरुळ व अन्य हद्दीत धाडसी घरफोड्या केला आहेत. यात काही गुन्हे चेनस्नॅचिंगचे असून याच अनुभवातून त्याने विनानंबर प्लेटच्या दुचाकींवरुन महिलांचे दागिने ओरबाडून नेण्याचा धडाका लावला होता.