लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon
चाळीस दिवसात दामदुपटच्या आमिषाने लासलगावकरांना २०० कोटींचा तर मुंबई, कलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद या ठिकाणाहून जवळपास हजार कोटींचा गंडा घालून कंपनी चालक फरार झाला असून सोमनाथ गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून सतीश पोपटराव काळे, योगेश परशुराम काळे रा. टाकळी विंचूर यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये (Lasalgaon Police Station) ३१८ (४),३१६ (२) (५), ६१ (२) अंनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासांतर्गत फसवणुकीचा (Fraud) आकडा आणि व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
हे देखील वाचा : Nashik News : ‘होम अरेस्ट’ला अटकाव; मोबाईलमध्ये फीचर
कंपनीचे सर्वेसर्वा सतीश काळे आणि संचालक योगेश काळे हा गायब असून त्यांचा लासलगाव पोलीस (Lasalgaon Police) शोध घेत आहे तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दिवसात पैसे डबल तर ४० एक दुचाकी मोफत तर दहा लाखाच्या गुंतवणुकीवर ४० दिवसात पैसे डबल तर एक चारचाकी मोफत अशा युक्त्या वापरताना नागरिकांना आमिष दाखवत कंपनी चे संचालक यांनी अनेक दलालांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया जमवली होती. सहा वर्षां अगोदर ढोकेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून लासलगाव व राज्यभरातील गुंतवणूकदारांची शंभर कोटीहून अधिकची फसवणूक केल्यानंतरही पुन्हा गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या नावान कंपनी सुरू करत झटपट श्रीमंत होण्याच्या स्कीम जाहीर केल्या.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष दाखवून ३७ लाख उकळले
यात नागरिकांनी (Citizen) जवळपास २०० कोटी रुपयांची गुंतवणुक (Investment) केल्याची चर्चा आहे. या घटनेने संपूर्ण लासलगाव शहरामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून यामध्ये मोठ्या राजकीय पुढार्यांसह, छोटे-मोठे व्यापारी, संस्था, महिला, बँकेचे कर्मचारी, शिक्षक तर काही मंदिरांच्या ट्रस्टने सुद्धा पैसे गुंतवल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामध्ये अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी स्वतःचे सोने नाणे गहाण ठेवून, मोडून, स्वतःच्या घरावरती कर्ज काढले तर काहींनी नातेवाईकांकडून पैसे आणत योजनेच्या माध्यमातून कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय होऊन दहा टक्के कमिशन घेत सर्व सामान्य नागरिकांना दाम दुप्पटीचे आमिष दाखवून रक्कम गुंतवण्यास भाग पाडले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा