Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमNashik Crime News : अटकेची भिती दाखवून दाेघा आयआयटी इंजिनिअरला पाच काेटींचा...

Nashik Crime News : अटकेची भिती दाखवून दाेघा आयआयटी इंजिनिअरला पाच काेटींचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

आम्ही ईडी आणि सीबीआय कार्यालयातून (ED and CBI Office) बाेलत आहाेत. तुमचे नाव मनीलाँन्ड्रींगच्या केसेसमध्ये आले आहे. तुमच्यावर आमची नजर असून तुम्हाला पुढील कारवाई टाळायची असेल तर आम्ही दिलेल्या बँक खात्यांवर (Bank Account) पैसे भरा, असे सांगत सायबर चाेरट्यांनी दाेघा आयआयटी व आयटी इंजिनिअरला तब्ब्ल पाच ते सव्वा पाच काेटी रुपये उकळून गंडा घातला आहे. दाेघे इंजिनिअर वयाेवृद्ध असून त्यांना धमकी देऊन आठ ते १० दिवसांत ही रक्कम वळती करुन घेतली. दरम्यान, सायबर चाेरट्यांनी ही रक्कम विविध मेजर बँक खात्यांतून पुढील एक तासांत १५०० बँक खात्यांवर वर्ग केल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे.

हे देखील वाचा : MVA Protest : नाशकात मविआचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन

७८ वर्षीय आयआयटी अभियंता (IIT Engineers) शहरात वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त असून पत्नी निवर्तली आहे. त्यांचा मुलगा परदेशात असून त्याच्याकडे ग्रीन कार्ड आहे. दरम्यान, दुसरा तक्रारदारही वयाेवृद्ध असून ताे देखिल आयटी इंजिनिअर पदावरुन निवृत्त झाला आहे. दाेघे इंजिनिअर एकमेकांच्या ओळखीचे नसले तरी, १९ जून ते ६ जुलै २०२४ या कालावधीत सायबर चाेरट्यांनी त्यांना अचानक व्हाट्सॲप व्हिडीओ व ऑडिओ काॅल केले. आम्ही मुंबई पाेलिसांच्या एलटी मार्ग पाेलीस ठाणे, सीबीआय, इडी कार्यालयांतून बाेलत आहाेत. तुमचा थेट संबंध ५० ते १०० काेटी रुपयांच्या बेकायदेशिर आर्थिक गुंतवणूक आणि मनीलाँन्ड्रिंगच्या केसेसमध्ये आढळला आहे. त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे तुमचे अटक वाँरंट स्थानिक न्यायालयासह (Court) सुप्रिम काेर्टाने काढले आहेत. त्यामुळे तुम्हास इडी, क्राईम ब्रान्च व सीबीआयचे पथक केव्हाही अटक करेल, अशी भिती घातली.

हे देखील वाचा : पुण्यात भर पावसात शरद पवारांच्या नेतृत्वात मविआचे आंदोलन; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

त्याचवेळी दाेघा इंजिनिअरला सर्वच प्रकरण खरे आहे हे भासविण्यासाठी व्हाट्सॲप नंबरवर एलटी मार्ग पाेलीस ठाण्याचा (Police Station) डीपी ‘शाे’ केला. याशिवाय, तुम्हाला तपास यंत्रणांनी नजरकैदेत ठेवले आहे. त्याबाबतचे तपास यंत्रणा व पाेलीस अधिकाऱ्याच्या बनावट सही, शिक्का, इनवर्ड नंबर असेलेल पत्र, कागदपत्रे दाेघांनाही व्हाटस्ॲपवर पाठविली. यानंतर आमचे गाेपनीय पथक तुमच्या एकूण एक बारीक हालचालीवर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे तुम्ही स्थानिक पाेलीस व नातलग व कुणासही या प्रकरणाबाबत कळवू नका. आम्ही तुम्हाला या प्रकरणांतून बाहेर काढू, मात्र, त्यासाठी तुम्हाला आम्ही बँक अकाउंटचा तपशिल चेक केला असून त्यात धक्कादायक व्यवहार झाल्याचे दिसते आहे. आम्ही पाठविलेले समन्स, नाेटीसांमध्ये उल्लेख केलेल्या बँक खात्यांवर आगाऊ रक्कम भरा, जेणे करुन तुमची कारवाईपासून तात्पुरती सुटका हाेईल, अशी भिती घातली. त्यामुळे पहिल्या अभियंत्याने चार ते सव्वा चार काेटी रुपये तर, दुसऱ्या अभियंत्याने पत्नीला अटक हाेऊ नये यासाठी एक ते सव्वा काेटी रुपये सायबर चाेरट्यांनी सूचविलेल्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. अशा प्रकारे दाेघांची या प्रकरणात पाच काेटींहून अधिक रकमेची फसवणूक (Fraud) झाली आहे. याप्रकरणी पुढील तपास रियाज शेख करत आहेत.

हे देखील वाचा : Shikhar Dhawan : शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

बँकेने केले सतर्क

७८ वर्षीय तक्रारदार कारवाईस घाबरल्याने त्याने पैसे टान्स्फर करण्यासाठी थेट जवळील बँक गाठली. तेव्हा इतकी माेठी रक्कम का व कशासाठी पाठवताय असे बँक व्यवस्थापनाने विचारले. मात्र, भेदरलेल्या तक्रारदाराने कामानिमित्त रक्कम लागते, ती पाठवावी लागेल असे सांगून वेळ मारुन नेली. काही दिवसांनी त्याला फसवणूक झाल्याचे समजलेे. दरम्यान, नाशिक शहर सायबर पाेलिसांनी तांत्रिक तपास केला असता, दाेघा अभियंत्यांनी काेट्यवधी रुपये समाेरील सबंधित विविध बँक खात्यांत वर्ग केले असता, त्यात खांत्यांतून एक तासात पुढील व्यवहार झाले. यानंतर याच वेळेच ही रक्कम एकूण १५०० विविध बँक खात्यांवर वर्ग झाल्याचे दिसले आहे. ज्या मुख्य खात्यात रक्कम गेली, त्या संबंधित खातेदाराचा सुगावा लागला आहे. त्याला नाशिक सायबर पाेलिसांनी उत्तर प्रदेशातून चाैकशीसाठी बाेलविले आहे.

पाेलिसांचे आवाहन

पाेलीस, ईडी, सीबीआय, एनआयए व अन्य तपास संस्था, यंत्रणा कधीही कुणासही बँक खात्यांत पैसे भरण्यास सांगत नाही. अशा प्रकारे धमकी, मनीलाँन्ड्रिंग, ड्रग्ज सापडले, सीमकार्डचा दहतवादी कारवायांसाठी वापर झाल्याचे कथित कॉल आल्यास तत्काळ जवळील सायबर पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदवावी. नागरिकांनी न घाबरता सतर्क रहावे. असे काॅल आल्यास दुर्लक्ष करावे किंवा काॅल ब्लाॅक करावेत.

रियाज शेख, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक, सायबर, नाशिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


   

- Advertisment -

ताज्या बातम्या