Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : एमडी विकणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Nashik Crime : एमडी विकणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवीन नाशकातील (New Nashik) पाटीलनगर येथे एमडी (मॅफेड्रॉन) विक्री करण्यास येणाऱ्या दोघा संशयितांना अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक (Arrested) केली. त्यांच्याकडून ३ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

- Advertisement -

अंमली पदार्थविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाटीलनगरमधील मनपा गार्डनच्या कंपाउंडलगत सार्वजनिक रस्त्यावर, त्रिमूर्ती चौक परिसर अंबड, नाशिक येथे रोहित नंदकुमार पवार ऊर्फ बिट्ट्या (२८, रा. फ्लॅट नं ०३, संगठा सफायर बी विंग, चेतनानगर, नाशिक), बाबू प्यारेलाल कनोजिया (३५, रा. एन-४२, ३/३/६, हेगडेवारनगर, त्रिमूर्ती चौक, नाशिक) हे एमडी मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरता येत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहाय्यक उपनिरीक्षक देवकिसन गायकर, सहाय्यक उपनिरीक्षक संजय ताजणे, हवालदार भारत बंबाळे, बलवंत कोल्हे, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अर्चना भड तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान पथकाचे (Dog Squad) हवालदार गणेश कोंडे, किसन पवार, नाना बर्डे यांच्या पथकाने दोघा संशयितांना सापळा रचून अटक केली.

दरम्यान, त्यांच्याकडून अंमली पदार्थ शोधक श्वान मॅक्स याच्या मदतीने अंदाजे ३ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचा ७१.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल असा एकूण ३ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी त्यांना न्यायालयात (Court) उभे केले असता न्यायालयाने त्यांना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...