नाशिक । प्रतिनिधी | Nashik
मंगल कार्यालयातून (Marriage Office) किंमती मुद्देमाल व एम्प्लिफायर लंपास करणाऱ्या चोरट्यांचा (Thieves) गुन्हे शाखा युनिट एकने (Crime Branch Unit One) शोध लावला आहे. यात एका रिक्षाचालकासह दोन महिलांचा समावेश उघड झाला आहे. पोलिसांनी तिघांकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मतिन हारुन शेख (२८, रा. वडाळागाव) असे संशयित चोराचे नाव असून त्याच्यासह इतर दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. नांदुरनाका येथील लक्ष्मी विजय लॉन्समधून चोरट्यांनी ८ ते ९ जानेवारी दरम्यान, एम्पली फायर आणि फॅन चोरून नेले होते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी (Police) परिसरातील सीसीटीव्ही तपासून तसेच हवालदार रमेश कोळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून भारतनगर परिसरातून दोन महिलांना पकडले. त्यांच्याकडील माहितीच्या आधारे रिक्षाचालकास पोलिसांनी तपास करीत पकडले. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रविण वाघमारे, कोळी, देविदास ठाकरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.