Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमUddhav Nimse : पळापळ केली पण वाया गेली; २५ दिवसांनी भाजपच्या निमसेंची...

Uddhav Nimse : पळापळ केली पण वाया गेली; २५ दिवसांनी भाजपच्या निमसेंची शरणागती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राहुल धोत्रे याच्या खूनप्रकरणात (Rahul Dhotre Murder Case) पसार असलेले भाजप पदाधिकारी तथा माजी नगरसेवक उद्धव ऊर्फ बाबा बाबूराव निमसे (Uddhav Nimse) अखेर पंचवीस दिवसांनी शहर पोलिसांना (City Police) शरण आले आहेत. निमसला आडगाव पोलिसांनी अटक केली असून आज मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

- Advertisement -

२२ ऑगस्ट रोजी रात्री निमसे व धोत्रे यांच्या गटात झालेल्या जबरदस्त राड्याप्रकरणी आडगाव पोलिसांत (Aadgaon Police) खुनाचा प्रयत्न केल्याच्या कलमांन्वये गुन्हा नोंद होता. हल्ल्यात राहुल संजय धोत्रे व अजय दत्तू कुसाळकर हे दोघे गंभीर जखमी होते. दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी गंभीर जखमी राहुल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर संतप्त धोत्रे गटाने घटनेचा निषेध करुन ‘उद्धव निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही’, अशी भूमिका घेऊन महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या. यानंतर धोत्रंसह वडार समाज व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन कठोर कारवाईची (Action) मागणी केली होती.

त्यानुसार, कर्णिक यांनी धोत्रे हत्याकांडाच्या तपासासाठी अंबड विभागाचे सहायक आयुक्त शेखर देशमुख यांची नेमणूक करुन एसआयटी (विशेष तपास पथक) गठित केली होती. तपास सुरु असतानाच या गुन्ह्यातील काही संशयितांना अटक करण्यात आली. मात्र, प्राणघातक हल्ला झाल्याच्या तिसऱ्या दिवसानंतर उद्धव निमसे पसार होते. त्यांच्या शोधार्थ शहर पोलिसांनी महाराष्ट्रासह परराज्यात पाच स्वतंत्र पथके रवाना केली होती. मात्र त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्याच दरम्यान निमसे यांनी ‘अटकपूर्व’ जामिनासाठी उच्च न्यायालयाय (High Court) धाव घेतली होती.

मात्र, बुधवारी (दि. १०) झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्तींनी निमसे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तरी त्यांनी शरणागती न पत्करता पळापळ सुरुच ठेवली होती. अखेर उच्च न्यायालयाचा दणका मिळाल्यावर सोमवारी (दि. १५) उद्धव निमसे दुपारी साडेतीन वाजता शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाच्या कार्यालयात हजर झाले. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी आडगाव पोलिसांना (Police) कळवून निमसेंचा ताबा सोपविला.

मुद्दे

  • धोत्रे खून प्रकरणात १५ हून अधिक संशयितांचा सहभाग
  • आतापर्यंत दहा जण अटकेत
  • निमसे २५ दिवसांनी आले शरण
  • धोत्रे कुटुंबाने केली कठोर कारवाईसह शिक्षेची मागणी
  • प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात निमसेंचा अटकपूर्व होता मंजूर

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात ‘रोहित’ पाहुण्यांचे दिमाखदार आगमन

0
नाशिक | जिमाका वृत्तसंस्था Nashik निसर्गाच्या किमयेचा एक अद्भुत अविष्कार सध्या नाशिक जिल्ह्याचे भूषण असलेल्या आणि महाराष्ट्राची शान असलेल्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या...