Tuesday, September 29, 2026
HomeनाशिकNashik Crime : महागड्या मद्यसाठ्यावर डल्ला; वाईन शॉप फोडले, चार लाखांच्या दारूसह...

Nashik Crime : महागड्या मद्यसाठ्यावर डल्ला; वाईन शॉप फोडले, चार लाखांच्या दारूसह डीव्हीआर गायब

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सर्वच देशी व विदेशी मद्याचे दर क्वार्टरमागे सरासरी ३० ते ९६ रुपयांपर्यंत वाढल्याने आता मद्यपींना तहान भागवणे कठिण होत आहे. अशातच गंगापूररोडवरील (Gangapur Road) वर्दळीच्या ठिकाणावरील वाईन शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख रुपयांची (Four Lakh) महागडी दारू चोरून नेली. या घटनेने मद्यविक्रेत्यांत धडकी भरली असून गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ‘डीव्हीआर’ ही लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे घरफोड्यांमध्ये आता वाईन शॉप चोरीचा ट्रेंड उद्भवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

चोरट्यांनी (Thieves) सीसीटीव्हीचा (CCTV) भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात राज्य सरकारने १६ जुलैपासून वाढ केली आहे. त्यामुळे नियमित तळीरामांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. श्रावणानिमित्त सध्या वाईन शॉपसह बारमध्ये मद्यपींची गर्दी नसली तरी ‘लाडक्या बहीण’ योजनेचा भार नाहक लाडक्या भावांवर टाकल्याने परवडत नसल्याची ओरड काही मद्यपी करत आहेत. त्यातच आता चोरट्यांनी वाईन शॉपकडे लक्ष केंद्रित केल्याचे समोर येत असून गंगापूर पोलिसांच्या (Gangapur Police Station) माहितीनुसार, संदीप कोकाटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोकाटे यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून नानाविध बॅण्डच्या ‘स्कॉच, व्हिस्की बॉटल’, ‘डीव्हीआर’ आणि ४५ हजार रुपये असा ४ लाख ३३ हजार २७५ मुद्देमाल लंपास केला. संशयितांनी दुकानाच्या (Shop) कुलुपासह बाजूची पट्टी तोडून दारू पळवली. सीसीटीव्हीचे फुटेज मिळू नये म्हणून ‘डीव्हीआर ‘देखील चोरून नेला. त्यामुळे संशयितांचा (Suspected) माग काढणे पोलिसांना अवघड होत असून, इतर तांत्रिक तपास सुरू आहे.

‘ड्राय डे’ला भरमसाठ दर

मद्यांच्या किमती वाढल्यापासून वाईन शॉप व बारमध्ये दर दुप्पटीपर्यंत पोहोचल्यानंतर ‘ब्लॅक’ने दारू विक्री होणाऱ्या ठिकाणीदेखील दरवाढ झाल्याचे कळते. शहरात ‘ड्राय डे’ किंवा वाईन शॉप बंद झाल्यानंतर संबंधित ठिकाणी दारू विक्री होत आहे. त्यामुळे वाईन शॉपमध्ये ‘क्वार्टर’ ६० ते ८० रुपयांनी, बारमध्ये १५० ते १८० रुपयांनी तर ‘ब्लॅक’ ने २०० ते २२० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : पिके करपलेल्या तालुक्यांना दुष्काळी लाभ; मुख्यमंत्री फडणवीस यांची...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai पिके करपलेल्या परंतु ट्रिगर -१ च्या पहिल्या निकषात न बसलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसऱ्या यादीत...