Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : पतीसाठी अटक वॉरंट फाडला; राड्यामुळे म्हसरुळ पोलीस मेटाकुटीस

Nashik Crime : पतीसाठी अटक वॉरंट फाडला; राड्यामुळे म्हसरुळ पोलीस मेटाकुटीस

नाशिक | Nashik

सन २०१९ मध्ये दाखल असलेल्या जबरी चोरीसह मारहाणीच्या गुन्ह्यात न्यायालयाच्या (Court) आदेशाने संशयितास अटक करण्यासाठी गेलेल्या म्हसरुळ पोलिसांसोबत संशयितासह त्याच्या पत्नीने झटापट करुन हैदोस मांडला.इतकेच नव्हेतर ‘पतीला अटक करु नका, सोडून द्या’, असे म्हणत पत्नीने म्हसरुळ पोलिसांत तुफान गोंधळ घालून कडेवरील लहान मुलाचे डोके जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न करीत ‘अटक वॉरंट’, कव्हरिंग लेटर चावून फाडून टाकला. शुक्रवारी (दि. १२) दुपारी घडलेल्या घटनेने म्हसरुळ पोलीसही मेटाकुटीस आले. अखेर महिला अंमलदारांनी ‘मध्यस्थी करुन संशयितास अटक करीत न्यायालयात हजर केले. तेव्हा त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

- Advertisement -

राकेशकुमार रामराज बिंद उर्फ निशाद (वय ३५) व बिंदूदेवी राकेशकुमार (वय ३०, दोघे रा. विठाईनगर, पवारमळा, पेठरोड) अशी संशयित दाम्पत्याची नावे आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्यासह चिथावणी दिल्याचा गुन्हा (Case) नोंद करण्यात आला आहे. शुकवारी दुपारी १२ वाजता म्हसरुळ पोलीस ठाण्यातील अंमलदार सोमनाथ गुंबाडे हे वॉरंट ड्यूटी करत असताना, प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी राकेशकुमार याच्याविरोधात सन २०१९ मध्ये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक वॉरंट (Arrested Warrant) जारी केले होते.

YouTube video player

त्यानुसार, गुंबाडे व इतर अंमलदार राकेशकुमारच्या घरी पोहोचले. तेव्हा पत्नी बिंदूदेवी हिने ‘पतीस पोलीस स्टेशनला नेऊ नका, असे म्हणत हुज्जत घातली. त्याचेळी त्याचे भाऊबंद उमेश बिंद, लक्ष्मी बिंद व रिमा बिंद यांनी बिंदूस समजावले असताना ‘सीआर’ मोबाईलवरील हवालदार वसावे, जाधव, महिला अंमलदार सोनवणे यांच्या मदतीने त्याला म्हसरूळ पोलीस ठाण्यात आणून दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्याची तयारी केली. त्याचक्षणी बिंदूदेवीने पोलीस ठाणे गाठून हुज्जत घालुन आरडाओरड सुरु केली.

तेव्हा, पोलिसांनी (Police) तिला ‘न्यायालयात कार्यवाहीसाठी घेऊन जात आहोत, तेथे त्याची कायदेशिर सुटका करून घे, असे सांगितले. तरीही तिने हात टेबलावर आपटून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, राकेशकुमार याने तिला चिथावणी देत कडेवरील मुलास जमिनीवर आपटण्यास सांगितले.तिनेही तत्काळ मुलाला आपटण्याचा प्रयत्न केला तेव्हा. गडबड गोंगाट ऐकून महिला अंमलदार भुसारेंसह आवारे, थोरात राकेश शिंदे, स्वप्निल गांगुर्डे, हवालदार सोनवणे आले. त्यांनी तिच्या तावडीतून लहानग्याची सुटका केली.

वॉरंट फेकले

राकेशकुमारला कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना, बिंदूदेवीने त्याला घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी एकत्रित त्याला ताब्यात घेत पुढील कार्यवाही केली. त्यावेळी झालेल्या झटापटीत बिंदूदेवीने टेबलावर असलेले कोर्टाचे एनबी वॉरंट, आरोपी अटक फॉर्म, अटकेची माहिती, संशयिताचे आधारकार्ड झेरॉक्स, न्यायालयाचे ‘कव्हरिंग लेटर’ अशी कागदपत्रे हातात घेऊन दाताने चावून हाताने फाडून फेकून दिली.

…अन् तो तुरुंगात

या गोंधळात राकेशकुमारने पत्नीस चिथावणी देत ‘तु या पोलीसांची नावे व त्यांनी आपल्याला मारहाण केली’, असे कोर्टात सांग म्हणून तिचा संताप वाढविला. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करुन घटनेची माहिती दिली. दरम्यान, न्यायालयाने राकेशकुमारला १७ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. दरम्यान, दाखल गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...