Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : दिंडोरीला युवकाचा खून; घरासमोर फेकून दिला मृतदेह

Nashik Crime : दिंडोरीला युवकाचा खून; घरासमोर फेकून दिला मृतदेह

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) ननाशी येथे जुन्या वादातून दोघांनी दिवसाढवळ्या एकाची हत्या (Murder) केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तालुक्यातील गणेशगाव (Ganeshgaon) येथील युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव येथील शेतकरी असलेला युवक (Youth) ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ (वय ४०) याचा अज्ञात इसमाने खून करून शेतातील (Farm) घरासमोर रात्रीच्या वेळेस मृतदेह टाकून देत पळून गेला आहे. गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा तालुक्यात खुनाची घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस (Dindori Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पंचनामा करून पुढील तपास दिंडोरी पोलिसांकडून (Police) केला जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...