Friday, May 3, 2024
Homeनाशिकहुसेन देत होता हुलकावणी; शिताफीने वाकडमधून घेतले ताब्यात

हुसेन देत होता हुलकावणी; शिताफीने वाकडमधून घेतले ताब्यात

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

गेल्या तीन वर्षापासून मोक्कासह इतर सहा गुन्ह्यात अशा एकूण सात गुन्ह्यात फरार असलेल्या हुसेन फिरोज शेख (वय 19, रा. सिन्नर फाटा नाशिक रोड) या अट्टल गुन्हेगाराला नाशिकरोड पोलिसांनी पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) येथील वाकड परिसरातून अटक केली आहे….(nashik criminal arrested from wakad pune)

- Advertisement -

पोलीस उपायुक्त विजय खरात (DCP Vijay Kharat), सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ (ACP Dr Sidheshwar Dhumal), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (Senior Police Inspector Anil shinde), गुन्हे शोध पथकाचे (crime branch) पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील (PSI Yogesh Patil) यांनी या संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश पाटील, पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार, शेख हा पिंपरी चिंचवड पुणे येथील वाकड परिसरात राहत असल्याचे समजले.

शेख हा ॲक्टिवा गाडीवर येत असतांना दिसला. त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला तो दुसरीकडे पळून जात होता. त्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आला.

एका गल्लीतील बंगल्याच्या बाजूस असलेल्या एका घराच्या मागील बाजूस असलेल्या उघड्या खोलीमध्ये गेल्यावर आतून दरवाजा बंद करून लपला होता. तेव्हा पोलीस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून त्यास पकडले. त्याच्यावर नाशिकरोड उपनगर व चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या