Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनाशिक सायकलिस्ट सहा देशांंच्या प्रवासाला

नाशिक सायकलिस्ट सहा देशांंच्या प्रवासाला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनचे सदस्य जगदीश गायकवाड हे शांतता व एकतेचा संदेश घेऊन सहा देशांमध्ये सायकल प्रवासासाठी मार्गस्थ झाले आहेत. त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन च्या वतीने सोमेश्वर महादेव मंदिर येथून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीची सांगता आनंदवल्ली गावातील मारुती मंदिराजवळ करण्यात आली.

- Advertisement -

जगदीश गायकवाड हे शांतता व एकतेचा संदेश घेऊन सहा देशांमध्ये सायकल प्रवासासाठी मार्गस्थ होत आहेत. यापूर्वी त्यांनी आयोध्या ते श्रीलंका पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकल प्रवास केला होता. तसेच गंगोत्री ते बांगलादेश गंगा स्वच्छता अभियान घेऊन यशस्वी सायकल प्रवास केलेला आहे. इंडिया ते इंडोनेशिया ही तब्बल 5हजार 900 की.मी.सायकल मोहीम शंभर दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. सायकलवर ते व्हिएतनाम , लाओस , कंबोडिया, थायलंड, मलेशिया , इंडोनेशिया या सहा देशात भेट देणार आहेत. तेथील संस्कृती, पर्यटन स्थळ याचा अभ्यास करत शांततेचा व एकतेचा संदेश देणार आहेत. हा संपूर्ण प्रवास ते सेल्फ सपोर्टेड करणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्याना या प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन च्या वतीने सोमेश्वर महादेव मंदिर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊन या रॅलीची सांगता मारुती मंदिर आनंदवली येथे झाली.

यावेळी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे प्रणेते हरीशजी बैजल त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी शिवसेना माजी गटनेते विलास शिंदे, सातपूर प्रभागाचे माजी सभापती संतोष गायकवाड, भीमराव कडलग, महेश हिरे, माजी नगरसेवक अरुण काळे, रॅम विजेते डॉ.महेंद्र महाजन ,नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन चे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, माजी अध्यक्ष किशोर माने, विशाल उगले, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले, व इतर सायकलिस्ट तसेच आनंदवली येथील समस्त ग्रामस्थ, गायकवाड परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केले.जगदीश गायकवाड यांचे भारतीय संस्कृतीनुसार महिलांनी औक्षण केले यांच्या अनोख्या सायकल मोहिमेस हरीशजी बैजल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या