Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik -Dindori Constituency Election Result 2024 : मतमोजणीस सुरुवात

Nashik -Dindori Constituency Election Result 2024 : मतमोजणीस सुरुवात

महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी

नाशिक | Nashik

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha) (दि.२० मे) रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी निकाल जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील एका गोडाऊनमध्ये या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

नाशिक लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर दिंडोरी लोकसभेत भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभेसाठी ६०.७५ तर दिंडोरीसाठी ६६.७५ टक्के इतके मतदान झाले होते. यामध्ये नाशिक लोकसभेतील २० लाख ३० हजार १२४ मतदानापैकी १२ लाख ३३ हजार ३८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात ६ लाख ७२ हजार ५७५ पुरुष तर ५ लाख ६० हजार ७७० महिलांनी मतदान केले होते.

तर दिंडोरी लोकसभेतील १८ लाख ५३ हजार ३८७ मतदारांपैकी १२ लाख ३७ हजार १८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात ६ लाख ७९ हजार ३९९ पुरुष तर ५ लाख ७७ हजार ७७७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

दरम्यान, नाशिक लोकसभेसाठी ३० तर दिंडोरी लोकसभेसाठी मतमोजणीच्या २६ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे दिंडोरीचा निकाल दुपारी तीन वाजेपर्यंत तर नाशिकचा निकाल संध्याकाळ पर्यंत लागण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या