Wednesday, May 7, 2025
Homeनाशिकनाशिक जिल्हा प्रशासनाकडून १ हजार ५७९ निर्वासितांना निवारागृहात निवारा

नाशिक जिल्हा प्रशासनाकडून १ हजार ५७९ निर्वासितांना निवारागृहात निवारा

नाशिक | करोनामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर होताच अनेक ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतून आपापल्या गावाकडे अनेक हातमजुर पायीचं निघाले होते. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयात इगतपुरी , सिन्नर, आणि नाशिक येथे प्रत्येकी दोन तर कळवण आणि नांदगांव येथे प्रत्येकी एक असे एकूण आठ ग्रामीण भागामध्ये आणि मनपा क्षेत्रात दहा ठिकाणी तात्पुरते निवारे बनविण्यात आले आहेत.

स्थलांतरित नागरिकांमध्ये महाराष्ट्र , उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि बिहार अशा परराज्यातील एकुण 1 हजार 579 मजूरांना निवारागृहात निवारा देण्यात आला असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

- Advertisement -

इतर जिल्हयातून इथ पर्यंत चालत आलेल्या निर्वासितांना मानवतेच्या दृष्टीने त्यांची अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. समाजावर वेगवेगळे संकट येते त्यावेळी अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे येत असून ही एक सुखावणारी गोष्ट आहे. आज आपल्याला असे चित्र दिसते की 10 ते 15 दिवसापासून लॉकडाऊन झालेले आहे.

लोकांचे उदरनिर्वाहाचे साधने नष्ट झालेली आहेत. तरी सुध्दा आपण ठिकून आहोत हि संकटातील चांगली गोष्ट आहे. आपण सर्व जण चांगली काळजी घेवून याच्यातून बाहेर पडू व आपल्या नियमित दिनक्रमाला सुरुवात करु, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नाशिक-पुणे महामार्गावरील आदिवासी वसतिगृह शिवाजीनगर, येथे थांबविण्यात आलेल्या एकुण 253 निर्वासिंतांची जिल्हाधिकारी यांनी भेट घेवून विचारपुस केली. यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, दाऊदी बोहरा ट्रस्टचे सदस्य, मंडळ अधिकारी मनोज गांगुर्डे उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या