नाशिक | Nashik
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. नाशिक न्यायालयाच्या या निर्णयाला कोकाटे यांनी आव्हान दिले होते. त्यावर आज (बुधवारी) सुनावणी झाली असता कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik District Court) स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोकाटे यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या आमदारकीवरील टांगती तलवार दूर झाली आहे. न्यायालयाने आजच्या सुनावणीत तिन्ही हस्तक्षेप याचिकांना (Petitions) कायदेशीर आधार नसल्याचे निरीक्षण नोंदवत त्या फेटाळल्याची माहिती कोकाटे यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलतांना दिली.