Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँक निवडणूक : सहकार पॅनलने केला 'समता'चा...

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँक निवडणूक : सहकार पॅनलने केला ‘समता’चा २१ विरुद्ध शून्य असा पराभव

नाशिक |प्रतिनिधी| Nashik

संपूर्ण शहर व जिल्ह्यातील शासकीय कर्मचा-यांचे लक्ष वेधल्या गेलेल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने 21 जागा पटकावत समता पॅनलचा २१ विरुद्ध शून्य असा धुव्वा उडवला. सहकार पॅनलने समता पॅनलच्या २७ वर्षांपासून अबाधित असलेल्या सत्तेला खिंडार पाडत  सत्तापरिवर्तन करून इतिहास घडविला.निकाल जाहीर होताच बँकेत परिवर्तन झाल्याचा आनंद सहकार पॅनलचे उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार जल्लोष करत केला. 

- Advertisement -

रविवारी (दि.2) बॅंकेच्या 21 जागांसाठी  किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले होते. बॅंकेच्या 8 हजार 58 सभासद मतदारांपैकी 5 हजार 749 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणुकीत, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब खताळे, रमेश राख यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी समता पॅनल तर जेष्ठ नेते उत्तमबाबा गांगुर्डे, महेश आव्हाड, रवींद्र थेटे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल यांच्यात सरळ सामना झाला. सोमवारी (दि.3) सकाळी ८ वाजेपासून औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लाॅन्स येथील सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी गौतम बलसाने, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी पंडीत पवार, मनिषा खैरणार यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला.

मतमोजणीसाठी 10 टेबलावर 200 कर्मचारी होते.पहिल्या टप्यात 10 मतपेटयांमधील मतपात्रिकांची जुळवणी करून दोन फेऱ्याच्या  मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासूनच सहकार पॅनलचे सर्व 21 उमेदवार आघाडीवर होते. साधारण 400 ते 600 मतांच्या  आघाडीचा पहिल्या फेरीअखेर कल होता.पहिल्या फेरीचा असलेला हा  कल अखेरपर्यंत कायम राहिला. निवडणुक निर्णय अधिकारी बलसाने यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करत, प्रमाणपत्राचे वाटप केले. बॅंकेच्या सेवानिवृत्त सभासदाचा मतदान अधिकार वगळण्यावरून तसेच निवडणुका पुढे ढकलत पुन्हा ठरल्यावेळी निवडणुक प्रक्रीया राबविली गेल्याने ही निवडणुक चांगलीच गाजली.

बारा संचालकांचे परिवर्तन ठरले निर्णायक 

निवडणूक जवळ येताच सत्ताधारी समता पॅनलमधील विद्यमान बारा संचालकांनी समता पॅनलला सोडचिठ्ठी देत सवतासुभा मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यापैकी सहा जनांना उमेदवारी मिळली.त्यांनी अनुभवाच्या जोरावर प्रचाराची रणनिती आखली. निर्णायक क्षणी त्यांनी आपला ठसा उमटवल्यामुळे सहकार पॅनल जोरदार मुसंडी मारण्यात यशस्वी झाला. एनटी गटातून सहकार पॅनलचे रवींद्र आंधळे यांनी समता पॅनलचे उमेदवार माजी व्हाईस चेअरमन प्रवीण भाबड यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला तर बाळासाहेब ठाकरे पाटील यांनी संचालक पदाची विजय हॅटट्रिक साधली. 

पोलीस उमेदवार वाद 

मतमोजणी केंद्रामध्ये ओळखपत्र चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीला, नातेवाईकांना देत मतदान केंद्रामध्ये प्रवेश मिळवून दिला जात होता. पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच पोलिसांनी अशा  कार्डधारकांना बाहेरचा रस्ता दाखवला जात होता. अशातच एका उमेदवारासोबत पोलिसांची बाचाबाचीही झाली. इतर उमेदवार आणि वरिष्ठ पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. 

जेसीबीमधून गुलालाची उधळण 

निवडणूकीचा निकाल जसजसा दृष्टिक्षेपात येताच विजयी उमेदवारांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल,ढोल पथक आणत विजयोदोत्सव साजरा केला.यातील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी तर  थेट जेसीबी  आणत सर्वांवर गुलालाची उधळण केली होता. मोठ्या निवडणूकांमध्ये जेसीबीच  वापर पहायला मिळतो. मात्र, कर्मचाऱ्यांची बँक आणि मतदारही कर्मचारी सभासद असलेल्या बँकेच्या या निवडणूकीतही जेसीबी आणल्याच्या चर्चांना उधान आले होते. 

कही खुशी कही गम 

मतमोजणीस प्रारंभ होताच निकालाचा कल दिसू लागला.पहिल्या फेरीपासूनच  सहकार पॅनल मुसंडी मारत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. दुसऱ्या फेरीतील पेट्यांचे मतदान जसजसे पुढे सरकू लागले तसतसे सहकार पॅनलने जल्लोष करायला सुरुवात केली, मात्र बाजूलाच बसलेल्या समता पॅनलच्या उमेदवारांमध्ये शांतता दिसून येत होती. 

सहकार पॅनलचे  विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते –   

सर्वसाधारण गट (१२ जागा) 

अजित आव्हाड ३२९९

सुनील गिते ३०८६

विनोद जवागे २८३३

बाळासाहेब ठाकरे पाटील २९५२

विजय देवरे पाटील ३१५०

निलेश देशमुख ३०१५

प्रमोद निरगुडे ३१३४

रवींद्र बाविस्कर २९३७

ज्ञानेश्वर माळोदे ३१०७

महेश मुळे ३००२

भरत राठोड २९८७

जयंत शिंदे २९१७ 

तालुका प्रतिनिधी (चार जागा) 

अभिजित घोडेराव ३१52

अमोल बागुल ३२४४

रमेश बोडके ३२१०

सचिन विंचूरकर ३१४६ 

इतर मागास प्रवर्ग (एक जागा) 

विक्रम पिंगळे ३२१० 

अनु जाती जमाती/ जमाती (एक जागा) 

मोहन गांगुर्डे ३११९ 

विमुक्त जाती भटक्या जमाती (एक जागा) 

रवींद्र आंधळे ३४२८ 

महिला राखीव ( दोन जागा) 

धनश्री कापडणीस ३२३२

मंदाकिनी पवार २७४३

समता पॅनलचे उमेदवार –

सर्वसाधारण (बारा जागा)

अमित आडके २२१८

दीपक अहिरे २०५०

प्रशांत कवडे २०१६

विजय खातळे २२११

सुरेश चौधरी १९११

राजेश निकुंभ १९४२

सुधीर पगार २२३५

अमित पाटील २१४१

सतीश भोरकडे १९१७

गणेश वाघ २१३२

शशिकांत वाघ १८१७

प्रीतीश सरोदे १८३२ 

तालुका प्रतिनिधी (चार जागा) 

प्रशांत गोवर्धने २२३०

संदीप दराडे २२८५

हेमंत देवरे २१६१

मिर्झा गफुर बेग इसाबेग १९६८ 

इतर मागास प्रवर्ग (एक जागा)

विजयकुमार हळदे २३८४ 

अनु जाती जमाती (एक जागा) 

प्रदीप अहिरे २४५२ 

विमुक्त जाती जमाती (एक जागा) 

प्रवीण भाबड २१३७ 

महीला राखीव (दोन जागा) 

मंगला ठाकरे २१४९

सरिता पानसरे २३०८

- Advertisment -

ताज्या बातम्या