Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik News : पाणीटंचाईचे संकट गडद; जिल्ह्यात १६.३७ टक्के जलसाठा

Nashik News : पाणीटंचाईचे संकट गडद; जिल्ह्यात १६.३७ टक्के जलसाठा

नाशिक | Nashik

राज्यभरात उन्हाच्या (Heat) तीव्रतेमुळे पाण्याचा (Water) वापर वाढला आहे. तर दुसरीकडे तापमानामुळे जलस्तर घटत असून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) जलसाठा देखील खालावला आहे. जिल्ह्यातील सर्व २४ प्रकल्प मिळून केवळ १६.३७ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे.

- Advertisement -

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) आज २८ टक्के पाणी शिल्लक असल्याने पाऊस लांबला तर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच ओइरखेड, पुणेगाव, माणिकपुंज ही धरणे कोरडी झाली आहेत. मान्सून प्रगतिपथावर असल्यामुळे हा प्रश्न काही दिवसांचा असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, जर हा जूनमध्ये बरसणारा पाऊस (Rain) लांबला अथवा जुन महिना कोरडा गेल्यास हाच पाणीप्रश्न गंभीर रुप धारण करेल. त्यामुळे नागरिकांसह (Citizens) प्रशासनाची चिंता वाढणार आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा

गंगापूर २८.१० टक्के, कश्यपी २३.५४ टक्के, गौतमी गोदावरी ११.०८ टक्के, पालखेड ८ १२ टक्के, दारणा २२.५१ टक्के, भावली ०.८४ टक्के, मुकणे १३.८७ टक्के, वालदेवी ६.७१ टक्के, नांदूर मध्यमेश्वर ९८.४४ टक्के, चणकापूर ४.८६ टक्के, हरणबारी ८.०६ टक्के, केळझर १.०५ टक्के, गिरणा २०.५८ टक्के

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या