Sunday, May 19, 2024
HomeनाशिकNashik Water Storage : जिल्ह्याला ऐन फेब्रुवारीत पाणी टंचाईच्या झळा; कोणत्या धरणात...

Nashik Water Storage : जिल्ह्याला ऐन फेब्रुवारीत पाणी टंचाईच्या झळा; कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ऐन फेब्रुवारी (February) महिन्यातच उन्हाचा पारा चढल्याने पाणी टंचाईच्या (Water Shortage) झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील (Dam) पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने सध्याच्या परिस्थितीत केवळ ५० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर ग्रामीण भागात स्थानिक जलस्त्रोत आटू लागल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढ लागली आहे. सध्या जिल्ह्यातील १७४ गावे आणि ३८५ वाड्यांना १७० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून ही संख्या पुढील महिन्यात वाढण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

जिल्ह्यात मध्यम आकाराची १७ आणि मोठी पाणीसाठवण क्षमता असणारी सात अशी एकूण २४ धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. मागील वर्षी आजमितीस या धरणांमध्ये ४४ हजार ५११ दशलक्ष घनफूट म्हणजेच ६८ टक्के पाणीसाठा होता. परंतु, यावर्षी २९ हजार ६५ दशलक्ष घनफूट म्हणजेच ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी हा पाणीसाठा कमी झाला आहे.

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयची धाड

सध्या गंगापूर धरणात आजमितीस ६१.३७ टक्के, कश्यपी धरणात ९१. ७४ टक्के, गौतमी गोदावरी धरणात ५६.२१ टक्के, आळंदी ५५.५१ टक्के, पालखेड २६.९५ टक्के, करंजवण ४६.८१ टक्के, वाघाड २६.०२ टक्के, ओझरखेड ४३.१९ टक्के, पुणेगाव ४९.२८ टक्के, तिसगाव २७.२५ टक्के, दारणा ४३.८२ टक्के, भावली ३३.५४ टक्के, मुकणे ४४.९४ टक्के, वालदेवी ८४.४७ टक्के, कडवा ३४.९८ टक्के, भोजापूर १६.३४ टक्के, चणकापूर ४३.१० टक्के, हरणबारी ४१.०८ टक्के, केळझर ४४.४१ टक्के, गिरणा ३३.३० टक्के, पुनद ७९.२५ टक्के, माणिकपुंज २१.४९ असा एकूण ४४.२६ टक्के पाणीसाठा आहे.

तर गेल्यावर्षी याच धरणांमध्ये अनुक्रमे गंगापूर धरणात ७४.४४ टक्के, कश्यपी धरणात ९२.२८ टक्के गौतमी गोदावरी ४३.२५ टक्के, आळंदी ५८.२१ टक्के, पालखेड ५१.१५ टक्के, करंजवण ६९.३२ टक्के, वाघाड ४८.३५ टक्के, ओझरखेड ७१.६० टक्के, पुणेगाव ६८.०८ टक्के, तिसगाव ५६.०४ टक्के, दारणा ७८.७२ टक्के, भावली ८३.४७ टक्के, मुकणे ८३.२० टक्के, वालदेवी ८७.५६ टक्के, कडवा ४५.८५ टक्के, भोजापूर ४४.८८ टक्के, चणकापूर ८०.८४ टक्के, हरणबारी ७५.७३ टक्के, केळझर ७२.३८ टक्के, गिरणा ५६.२२ टक्के, पुनद ८५.०७ टक्के, माणिकपुंज ४२.६९ टक्के, नागासाक्या ३६.२७ असा एकूण ६७.६९ टक्के पाणीसाठा होता.

Nashik Crime News : स्वत:वर गोळी झाडून दुय्यम पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपाययोजना करण्याच्या सूचना

जिल्ह्यातील धरण साठ्यातील पाण्याची पातळी खाली जात असताना धरण परिसरातील गाळ काढून पुढील वर्षासाठी पाणीसाठा वाढवण्यावर भर देण्यासाठी तयारी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मिशन भगिरथ, रेन वॉटर हार्वेस्टिंग या उपक्रमावर आतापासूनच विशेष लक्ष द्यावे, पाण्याचा गैरवापर रोखणे, इतर जलसाठ्यांचे नियोजन करणे, दर महिन्याला पाण्याची स्थिती पाहून पाण्याचे नियोजन करणे व त्या अनुषंगाने भविष्यातील पाणी कपातीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Nashik Crime News : खून झालेल्या ‘त्या’ युवकाची ओळख पटली

- Advertisment -

ताज्या बातम्या