Saturday, May 10, 2025
Homeनाशिकनाशिक जिल्हा महिला काँग्रेसचा बिऱ्हाड मोर्चाला पाठिंबा

नाशिक जिल्हा महिला काँग्रेसचा बिऱ्हाड मोर्चाला पाठिंबा

नाशिक | प्रतिनिधी

आदिवासी विकास विभागाचे (दि. २५ मे )शासन पत्र रद्द करून दहा वर्षांखालील कार्यरत सर्व रोजंदारी वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांना सेवेत संरक्षण देऊन शासन सेवेत समायोजन करण्यासाठी निघालेल्या बिऱ्हाड मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांनी त्यांना पाठिंबा देत मोर्च्यात दररोज सहभागी होत आहेत.

- Advertisement -

महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांच्यासह काँग्रेसच्या महिला देखील या आंदोलानात सहभागी झाल्या असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी काँग्रेस तर्फे पाठपुरावा करण्यात येऊन नाना पाटोले यांची आपण भेट घेणार असून मागणी मान्य होई पर्यंत पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यानी दिली.

यावेळी मोर्चेकरी योगिता पवार,रुपाली कांडळ,करुणा पाटील,ललित चौधरी,अतुल गुरव,विनायक खरात,धीरज चौधरी आणि सहकारी मोर्च्यात सहभागी होते. काँग्रेस तर्फेपाटील यांच्यासह दीपाली मिस्त्री,सुमन महाले,प्रतिभा लाड आधी महिला सहभागी आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Operation Sindoor : पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युतर

0
दिल्ली | वृत्तसंस्था आज रात्री राजस्थान, जम्मू, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांच्या सीमा भागात पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केले आहेत. दरम्यान भारतीय लष्काराने पाकिस्तानच्या...