Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : महाआवास अभियानात नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर

Nashik News : महाआवास अभियानात नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

हक्काचे घर हे गरिबाला बंगल्यासारखेच आहे. महाआवास अभियाना अंतर्गत गरीब माणसाचे स्वप्न आपण पूर्ण करत आहोत. ग्रामविकास मंत्री असताना देशात पहिला क्रमांक आला होता. आज या अभियानात नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, नाशिक विभागाने विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट पूर्ती मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अभिनंदन केले.

- Advertisement -

नाशिक जिह्यातील १ लाख ४५ हजार ७२७ घरकुल लाभार्थ्याना मंजूरी पत्र देण्यातआले. तर ८० हजार घरकुल लाभार्थ्याच्या खात्यावर घरकुलाच्या पहिला हप्त्याचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात जलसंपदा तथा आपत्ति व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आ.सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुरी पत्र वितरण करण्यात आले.

ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी राज्यात महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासनाकडून दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी लाभार्थ्यांना मंजूरी पत्र देणे व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास आ. सीमा हिरे, देवयानी फरांदे, विभागीत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, आयुक्त कार्यालयातील डॉ. सारिका बारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्ह्यातील विविध लाभार्थी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

दरम्यान, राज्याच्या एकूण २० लाख घरकुल उद्दिष्टपैकी ५ लाख ४३ हजार ४२४ घरांचे उद्दिष्ट नाशिक विभागाला असून नाशिक विभागाने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट पूर्ती मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. संख्यात्मक दृष्टया नाशिक विभागातील ५ पैकी ४ जिल्हे राज्यात प्रथम पाच मध्ये आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...