Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापदवीधरसाठी आज मतदान

पदवीधरसाठी आज मतदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ( Nashik Division Graduate Constituency Election) आज सोमवारी (दि.30) सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक रिंगणात 16 उमेदवार असून त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

- Advertisement -

16 उमेदवार नशीब आजमावत असले तरी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीपुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यातच खरी लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी (दि.2) मतमोजणी होणार आहे.

नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रे आहेत. सर्वाधिक मतदान केंद्रे अहमदनगर जिल्ह्यात असून तेथील मतदान केंद्रांची संख्या 147 आहे. नाशिकमध्ये 99, जळगाव जिल्ह्यात 40, धुळ्यात 29 तर नंदूरबार जिल्ह्यात 23 मतदान केंद्रे आहेत.

विभागात आज ड्राय डे

निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदानाच्या दिवशी सोमवारी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली असून कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. मद्यविक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे परवानाधारकांवर बंधनकारक असणार आहे.

नशीब आजमावणारे उमेदवार :- नाशिक पदवीधर मतदारसंघातून रतन बनसोडे, नाशिक (वंचित बहुजन आघाडी), सुरेश पवार, नाशिक (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), अनिल तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, धुळे (अपक्ष), अविनाश महादू माळी, नंदूरबार (अपक्ष), इरफान मो. इसहाक, मालेगाव, (अपक्ष), ईश्वर पाटील, धुळे (अपक्ष), बाळासाहेब घोरपडे, नाशिक, (अपक्ष), जुबेर नासिर शेख, धुळे (अपक्ष), सुभाष जंगले, श्रीरामपुर (अपक्ष), सत्यजित तांबे, संगमनेर (अपक्ष), नितीन सरोदे, नाशिक (अपक्ष), पोपट बनकर, अहमदनगर, (अपक्ष), शुभांगी पाटील, धुळे (अपक्ष), सुभाष चिंधे, अहमदनगर, (अपक्ष), संजय माळी, जळगाव, (अपक्ष )असे एकूण 16 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

तांबेंना भाजपचा पाठिंबा

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने हो-ना करता अखेर मतदानाच्या पूर्वसंध्येला अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ही माहिती दिली. मात्र हा स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला निर्णय असल्याचे विखे यांनी सांगितले. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या